ताज्या बातम्याराजकारण

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सुनबाई सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील माढ्याच्या रणांगणात…

दिराच्या विरोधात भावजय, महायुतीचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या होम टू होम प्रचाराचा शुभारंभ होणार.

अकलूज (बारामती झटका)

माढा लोकसभा निवडणूक 2024 पंचवार्षिक निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार श्री. रणजितसिंहजी नाईक निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्नुषा सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील (वहिनीसाहेब) यांचा अकलूज शहर होम-टू-होम प्रचार दौरा गुरूवार दि. ०२/०५/२०२४ रोजी अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून तीन सत्रामध्ये होम-टू-होम प्रचार करणार आहे.

सकाळ सत्र सकाळी ८ ते दुपारी १ – सकाळी ८ वाजता श्री अकलाई देवी मंदिरापासून सुरुवात अकलाईनगर-गुरुनगर-शनी मंदिर-काझी गल्ली-शिवाजी चौक-रामायण चौक-देशमुख गल्ली-जुनी ग्रामपंचायत-हनुमान मंदिर- बागवान गल्ली-रमामाता चौक-अंबाबाई मंदिर-पंचशील नगर-होनमाने प्लॉट.

दुपार सत्र ३ ते ५ – मसुदमाळा-समतानगर-रणजीतनगर-पंचवटी-२१चारी.

सायंकाळ सत्र ५.१५ ते ९.३० – महादेव मंदिर-विजय चौक-इंदिरा गल्ली-लोणार गल्ली-वडार गल्ली-खडके बोळ-संभाजी चौक-किल्ला रोड-खाटीक गल्ली-हनुमान तालीम-पाटील वाडा-सुतार नेट-काझी गल्ली.

तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. दिराच्या विरोधात भावजय निवडणुकीच्या प्रचाराच्या रणांगणात उतरणार असल्याने अकलूज व पंचक्रोशीमध्ये माढा लोकसभेच्या निवडणुकीत रंगत वाढणार असून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय बळ वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर च्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अकलूज येथील विजय चौकात जनसेवा संघटना व प्रतापगडाची भूमिका स्पष्ट केलेली होती. त्यानंतर त्यांच्या स्नुषा सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील होम टू होम प्रचार करणार आहेत. अकलूज ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. वहिनीसाहेब यांच्या होम टू होम प्रचाराने महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort