जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी धन्यकुमार काळे तर, सरचिटणीस मच्छिंद्रनाथ मस्के यांची निवड
पंढरपूर ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी श्री. धन्यकुमार काळे, कनिष्ठ सहाय्यक यांची निवड तर सरचिटणीस पदी श्री. मच्छिन्द्रनाथ मस्के, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवड करणेत आली.

पंचायत समिती पंढरपूर येथे झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या सभेमध्ये महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष पदावर कनिष्ठ सहाय्यक श्री. धन्यकुमार काळे यांची तर सरचिटणीस पदावर श्री. मच्छिन्द्रनाथ मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष म्हणून कनिष्ठ अभियंता श्री. आर. एम. आतार, तर उपाध्यक्ष म्हणून ग्रामसेवक श्री. सुरेश इंगोले, प्रसिद्धी प्रमुख श्री. राहुल डोईजोडे यांची तर महिला उपाध्यक्ष पदावर श्रीम. अर्चना खांडेकर यांची, महिला प्रतिनिधी म्हणून श्रीम. वंदना पंडित, श्रीम. प्रेरणा हंबीर यांची तर कोषाध्यक्ष पदावर श्री. मकरंद देशपांडे यांची, सह सचिव पदावर पशुधन पर्यवेक्षक श्री. आर. बी. मोहिते, यांची सह सचिव पदी तर संघटक पदावर श्री. मंगेश शिंदे व सल्लागार म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. प्रफुल्ल माळी, श्री. गुरुनाथ जाधव, श्रीम. सुनंदा सुरवसे यांची सर्वानुमते निवड करणेत आली.

यावेळी जिल्हा महासंघाचे श्री. दिनेश बनसोडे, श्री. राजेशजी देशपांडे, श्री. सचिन मायनाळ, श्री. आनंद साठे, श्री. विजय कुलकर्णी, श्री. प्रमोद धावड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. प्रफुल्ल माळी, सहाय्यक लेखाधिकारी श्री. गुरुनाथ जाधव, वाहन चालक संघटनेचे राज्य पदाधिकारी श्री. नितीन भालके, नर्सेस संघटनेचे श्री. सुनंदा सुरवसे, लिपीक वर्गीय संघटनेचे श्री. दत्तात्रय लवटे, श्री. समीर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. प्रमोद धावड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. प्रफुल्ल माळी यांनी केले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश गोडसे, लेखा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. गुरुनाथ जाधव, तसेच प्रशासन अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रफुल्ल माळी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे श्री. लक्ष्मण वंजारी यांनी शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
