लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सभागृहातील प्रश्नामुळे श्री महालक्ष्मी देवीच्या भाविकभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिलीव येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेत भाविकांना मूलभूत सुविधा देऊन अतिक्रमण विळख्यातून बाहेर काढण्याचा ज्वलंत प्रश्न उपस्थित केला.
पिलीव (बारामती झटका)
पिलीव ता. माळशिरस येथील श्री महालक्ष्मी देवीच्या १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत १५ लाख भाविक येतात. मात्र, त्यांना सुविधा मिळत नसल्याने त्यासाठी यावर्षीपासून जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती गठण करून भाविकांना सुविधा देणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील बोलत होते. महालक्ष्मी देवीच्या भाविकभक्तांचा जिव्हाळ्याचा व अडचणीचा प्रश्न सुटणार असल्याने लोकप्रिय दमदार आमदार यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत भाविकभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पिलीव येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमेला ही यात्रा भरते, ती १५ दिवस चालते. यात्रेला सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही दररोज लाखो भाविक येतात. परंतु, या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा आहे. देवस्थानची २०० एकर जमीन असूनही यातील बहुतांश जमिनीवर आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अत्यंत कमी जागेत यात्रा पार पडते. भाविकांचे हाल होतात.
यामुळे भविष्यात काळूबाई मंदिरासारखी एखादी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय या यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्या मिळण्याचा त्यांचा हक्क असताना त्यांना त्या मिळणार का ?, यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाला देणार का ?, व देवस्थानच्या मालकीच्या २०० एकर जमिनीसंदर्भात महसूल प्रशासनाची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार का ?, असा प्रश्न लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सभागृहात विचारला होता.
त्यास उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व लोक प्रतिनिधींना घेऊन समन्वय समिती गठीत करून त्यांना भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना देण्याचे, तसेच देवस्थानच्या जमीनी संदर्भात माहिती घेऊन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
यात्रेच्या कालावधीत भाविकांची गर्दी होत असल्याने व्यवसायिक व यात्रेकरू यांना जागेची मोठी अडचण भासत आहे. देवीची जागा असून सुद्धा अडचण होत होती. अनेक भाविकांच्या मनामध्ये इच्छा होती, श्री महालक्ष्मीच्या देवीसाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा. अतिक्रमण हटवून मोकळ्या मनाने यात्रा व्हावी अशी इच्छा होती. देवीचे मानाचे पुजारी यांच्या देवीच्या दिनचर्या कार्यक्रमांमध्ये व अधिकारांमध्ये काहीही अडचण येणार नाही. पहिल्या रुढीपरंपरेपासून मानाचे देवाचे पुजारी असणार यांचा मान तसाच राहणार आहे. जरी समिती गठीत झाली तर ती विकास कामे व इतर सुविधा पुरविण्याकरता राहणार आहे. यामुळे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भविष्यात भरणार असल्याने भाविकभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng