अकलूज नगरपरिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी व काँग्रेस आय पक्षात निवडणूक होण्याची शक्यता
फत्तेसिंह माने पाटील व पांडुरंग देशमुख यांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ताकद सारखीच, सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यासाठी मिळणे अवघड, मिळालेच तर डिपाॅझिट वाचवणं तारेवरची कसरत, अशी अवस्था
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपरिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होईल. त्यावेळी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस आय पक्षात मोहिते पाटील विरूद्ध मोहिते पाटील अशी समोरासमोर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग देशमुख यांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आहे. दादा आणि भाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहिल्यास अकलूज नगरपरिषद हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षाची ताकद सारखीच आहे. सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यासाठी उमेदवार मिळणं अवघड आहे आणि मिळालेच तर किती तरी उमेदवारांची डिपाॅझीट वाचवणं तारेवरची कसरत करावी लागणार, अशी अवस्था असल्याने सध्या तरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
अकलूज नगरपरिषदेच्या निवडणूकीत रंगत येणार आहे. पहिल्यांदा निवडणूक होत आहे. प्रभाग रचना झालेली आहे. 13 प्रभागातून 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून निवडून जाणार आहेत. 50% महिला आरक्षण असल्याने 13 जागांसाठी महिला उमेदवार उभे राहतील. उर्वरित जागेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गटातील 3 जागा जातील उर्वरित जागा सर्वसाधारण जागेवर उमेदवार उभे राहतील. अजून ओबीसी आरक्षणाचा निर्णय होणार आहे. अकलूज नगरपरिषदेत 26 उमेदवार निवडणुकीतून निवडून येतील. 2 नगरसेवक स्वीकृत घेतले जाणार तर 28 नवनियुक्त नगरसेवक नगर परिषदेचे कामकाज पाहणार आहेत. पहिल्यांदा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण होईल याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
शिवरत्न बंगल्यावरील मोहिते पाटील भारतीय जनता पक्षात आहेत तर प्रतापगडावरील मोहिते पाटील काॅंग्रेस आय पक्षात आहेत. फत्तेसिह माने पाटील व पांडुरंग देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीवेळी फत्तेसिंह माने पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व पांडुरंग देशमुख यांनी एकत्र येऊन निवडणूकीत उर्वशीराजे मोहिते पाटील बिनविरोध तर गिरीराज माने पाटील व ज्योतीताई कुंभार दोन सदस्य निवडून आलेले होते. इतर सदस्यांना लक्षणीय मते पडलेली होती.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे नेते फत्तेसिंह माने पाटील व पांडुरंग देशमुख काय भूमिका घेतात याकडे, लक्ष लागून राहिलेले आहे. तिघे मिळून मिसळून निवडणूक लढविणार असल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे सरकार जावून भारतीय जनता पक्षाचे व बंडखोर शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. याचाही फटका राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस पक्षाला बसणार आहे. मुळात भाजप मधील म़ोहिते पाटील यांचे मोठ्या प्रमाणात अकलूजवर प्राबल्य आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे उर्वरित राष्ट्रवादी व संपूर्ण शिवसेना यांचे प्राबल्य नगण्य आहे, हे वास्तव आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस का ? भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे, अशी माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng