ताज्या बातम्या

अकलूज नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकला….

लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभाग पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे, पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गणेश पिंगुवाले यांच्या पथकाची दमदार कामगिरी….

अकलूज (बारामती झटका)

घटक :-सोलापूर
तक्रारदार :- पुरुष, वय 33 वर्षे
आरोपी– लोकसेवक नितीन सिद्राम पेटकर, वय 40 वर्षे, पद – स्वच्छता निरीक्षक, अकलूज नगरपरिषद, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर, रा. अक्कलकोट, जि. सोलापूर. (वर्ग 3)
लाच मागणी रक्कम :- 1,95,000/-रु लाचेची मागणी.
▶️ पडताळणी व सापळा दिनांक:- 25.10.2024
हकीकत :- अकलूज नगरपरिषदेने शहरातील साफसफाई करणे कामी मनुष्यबळ पुरवठा करणे करिता प्रसिद्ध केलेले टेंडर तक्रारदार यांच्या संस्थेस मिळाले होते, त्याप्रमाणे तक्रारदार यांनी मनुष्यबळ पुरवठा केला होता, यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतन बिल काढण्यासाठी वेतन बिलाच्या 3 टक्के रक्कम व वर्क ऑर्डर दिल्याचा मोबदला 1,50,000/- रुपये असे एकूण 1,95,000/- रु. लाचेची मागणी केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले आहे, यावरून वर नमूद लोकसेवक यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
➡️ सापळा पथक श्री. गणेश पिंगुवाले, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर.
पोलीस अंमलदार एएसआय/कोळी,
पोह/नरोटे व चालक पोह/ राहुल गायकवाड सर्व नेमणूक लाप्रवि, सोलापूर.

➡️ पर्यवेक्षण अधिकारी :- श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. सोलापूर.
मार्गदर्शन अधिकारी :-
श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.

डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

सक्षम अधिकारी :-
मा. आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचनालय, बेलापूर, नवी मुंबई

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणांस कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी स्वतः अगर खाजगी इसमाच्या मार्फतीने कोणतेही शासकीय काम करण्यासाठी अगर न करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे संपर्क साधावा.

(गणेश कुंभार)
सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मो.क्र. 9764153999
कार्यालय क्र. 0217-2312668
ईमेल- [email protected]
Toll free no 1064

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button