अकलूज प्रांताधिकारी पदी श्री. नामदेव टिळेकर यांची नियुक्ती…
…. अखेर अकलूज उपविभागाच्या प्रांताधिकारी पदी श्री नामदेव टिळेकर यांची कायमस्वरूपी नियुक्ती….
अकलूज ( बारामती झटका )
उपविभागीय अधिकारी माळशिरस या रिक्त पदावर उपविभागीय अधिकारी बीडचे श्री नामदेव टिळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी केलेल्या सर्वसाधारण बदल्या सन 2023 उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये अकलूज उपविभागाला कायमस्वरूपी प्रांताधिकारी श्री. नामदेव टिळेकर यांच्या रूपाने अधिकारी मिळालेले आहेत.
उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या सक्तीच्या रजेनंतर मंगळवेढा उपविभागाचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडे काही महिने पदभार होता. सध्या माढा कुर्डुवाडी प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे पदभार होता. अनेक महिने उलटून गेले तरीसुद्धा माळशिरस उपविभागाला कायमस्वरूपी प्रांताधिकारी लाभलेले नव्हते. बारामती झटका यांनी प्रभारी प्रांताधिकारी असल्याने अनेक शेतकऱ्यांची व श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी कायमस्वरूपी प्रांताधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा मथळ्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर महसूल व वन विभागाने औरंगाबाद विभागात कार्यरत असणारे श्री. नामदेव टिळेकर यांना पुणे विभागात काम करण्याची संधी डॉ. माधव वीर यांनी उपविभागीय कार्यालयात पदस्थापना दिलेली आहे. त्यामुळे अनेक दिवसाची माळशिरस तालुक्याची कायमस्वरूपी प्रांताधिकारी असणारी मागणी अखेर पूर्ण झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng