ताज्या बातम्याराजकारण

अकलूज मधून राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा वाढदिवसाचा फलक गायब..

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उत्तमराव जानकर यांचा बाजार समितीच्या गेट समोरून बोर्ड कोणी गायब केला ? अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल…

अकलूज ( बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस 17 जुलै रोजी असतो. त्यानिमित्त माळशिरस तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावलेले आहेत. अकलूज येथील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोरील दहा बाय वीस असा असणारा बॅनर रात्रीत गायब झालेला असल्याने अकलूज पोलीस स्टेशन येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक दादा गायकवाड, साजिद भाई सय्यद, राजीव गायकवाड व इतर यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींनी बॅनर काढून नेलेला असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारी अर्जात केलेली आहे.

तक्रारी अर्जामध्ये उत्तमराव जानकर साहेब यांचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्त अकलूजमधील महर्षी चौक कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोर बॅनर रविवारी संध्याकाळी लावलेले होते. त्यापैकी बाजार समिती जवळील लावलेला बॅनर अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्यावेळी कोणाच्यातरी सांगण्यावरून हे बॅनर काढण्यात आले आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातून कोणी हा बॅनर काढला आहे, हे तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यामागील मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, असा तक्रारी अर्ज अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेला आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोरून विद्यमान संचालक यांच्या वाढदिवसाचा बॅनर गायब होण्याची घटना पहिल्यांदाच अकलूजमध्ये घडलेली आहे. सदरच्या घटनेचे तीव्र पडसाद माळशिरस तालुक्यात जानकर प्रेमी यांच्यामधून उमटलेले आहेत. अकलूजमधून उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसाचा बॅनर गायब करणारे व गायडन्स करणारे कोण असावे ?, असा प्रश्न माळशिरस तालुक्यातील जनतेला पडलेला आहे. अकलूज पोलीस स्टेशन कशाप्रकारे तपास करणार, याकडे जानकर समर्थक यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. विशेष म्हणजे अकलूज नगर परिषद यांची परवानगी घेऊन वाढदिवसाचे बॅनर लावलेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button