अकलूज येथील मोरया गणपती मंडळास माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट
अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील मोरया गणपती मंडळास अकलुज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी नागरिकांनी परिसरातील अनेक अडचणी सांगितल्या. येत्या काही काळात या सर्व अडचणी सोडवून भविष्यात या भागात पिण्याच्या पाण्याची, गटारीची व विविध अडचणी सोडविल्या जातील असे सांगितले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कु. गोपाळ मस्तुद यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी या प्रतिष्ठान व मंडळाचे मार्गदर्शक मारुती क्षिरसागर यांनी गणेशोत्सवामध्ये महिलांसाठी घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.



यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी विशेष करून सर्व महिलांच्या अडचणी समजून घेत त्या संपूर्ण अडचणी सोडवण्याचे आश्र्वासन दिले. यावेळी मंडळाचे गोपाळ शिवाजी मस्तुद, सुदेश मारुती क्षिरसागर, विजय बबन गायकवाड, रविराज शिवाजी जाधव, सागर किरण शिंदे, हरिश्चंद्र किसन काळे, आर्यन भिमराव नागरगोजे, तेजस शहाजी माने देशमुख यांच्यासह सौ. वंदना मारुती क्षिरसागर, सौ. अर्चना किसन काळे, सौ. रेखा शिवाजी मस्तुद, सौ. चंचलाताई किरण शिंदे, श्रीमती मायाताई बबन गायकवाड व परिसरातील सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमात व स्पर्धेत सहभागी होवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती क्षिरसागर, शिवाजी मस्तुद, हमीद मुलाणी, राजाभाऊ माने, मदन चव्हाण व परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

