अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जनजागृती रॅली संपन्न
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
अकलूज ता. माळशिरस येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी केले. यावेळी माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळासाहेब मुळीक, महाविद्यालयाचे प्रबंधक युवराज मालुसरे उपस्थित होते.
या रॅलीचे महाविद्यालयाच्या प्रांगणातून, प्रतापसिंह चौक, सदुभाऊ चौक या मार्गाने परत महाविद्यालय अशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेले होते. या रॅली प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० चे महत्व विशद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. हे नवीन शैक्षणिक धोरण भावी पिढ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी या नवीन शैक्षणिक प्रवाहमध्ये सहभागी व्हावे.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर, डॉ. सज्जन पवार, प्रा. स्मिता पाटील यांनी परिश्रम घेतले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng