अकलूज येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय महाशिबिराच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन..
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आ. रणजितसिंह मोहिते पाटील कार्यक्रमाचे उद्घाटक, आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार.
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत तहसील कार्यालय, माळशिरस तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय विभाग/कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तालुकास्तरीय महाशिबिराचे उद्घाटन समारंभ कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते आणि लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १७/६/२०२३ रोजी सकाळी १० वा. कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉल, अकलूज येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माळशिरसचे तहसीलदार अमरदीप वाकडे आणि उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूजचे नामदेव टिळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng