ताज्या बातम्याराजकारण

भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या कुरतडणाऱ्या भुंग्याच्या मागे पक्ष विरोधी कारवाईचा भुंगा लागणार…

माळशिरस (बारामती झटका)

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामधील नेते, कार्यकर्ते व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करून महाविकास आघाडीला सहकार्य केलेले आहे तर काही ठिकाणी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे असताना सुद्धा भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या कुरतडणाऱ्या भुंग्यांच्या मागे पक्ष विरोधी कारवाईचा भुंगा लागणार असल्याचे पक्षाच्या विश्वासनीय अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.

लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे निगेटिव्ह प्रचाराचे मुद्दे समोर करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागलेले होते. लोकसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशानंतर महायुतीतील विशेष करून भाजपमधील लोकप्रतिनिधी व नेते बावरलेले होते. त्यांनी महायुतीच्या विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काम करून विरोधी उमेदवारांना छुपा पाठिंबा देऊन पक्षाशी गद्दारी केलेली आहे. अशा गद्दारांना पक्षाने पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल नोटीस दिलेली आहे. नोटीशीला थातूरमातूर उत्तर दिलेले आहे. पक्षाची कारवाई सुरू आहे. भाजप व संघातील वरिष्ठ नेत्यांच्या हातापाया पडून पक्षातून हकालपट्टी होण्याची कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाने निर्णय घ्यावा. लोकप्रतिनिधी नेते व कार्यकर्ते जर पक्षविरोधी भूमिका घेत असतील आणि पक्षाचे जाणीवपूर्वक नुकसान करीत असतील तर अशा गद्दारांसाठी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतलेली असल्याने भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या कुरतडणाऱ्या भुंग्यांच्या मागे पक्ष विरोधी कारवाईचा भुंगा लागणार, अशी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून अधिकृत माहिती समोर येत आहे .

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button