…. अखेर शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्या विरोधातील माळशिरस तालुक्यातील समविचारी दोन गटाचे शिवतीर्थ येथे मनोमिलन झाले
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समविचारी विरोधी गटातील सर्व नेते एकत्रित येऊन वज्रमुठ बांधली.
माळशिरस ( बारामती झटका )
शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाच्या विरोधातील माळशिरस तालुक्यातील समविचारी दोन गटाचे मनोमिलन झाले असून माळशिरस येथील शंकरनाना देशमुख यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर बैठक झालेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समविचारी गटातील सर्व नेतेमंडळींनी एकत्रित येऊन वज्रमुठ बांधलेली आहे.
शिवतीर्थ बंगला येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील. भाजपचे प्रांतिक सदस्य व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष निमंत्रित माजी संचालक राजकुमारनाना पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. रामदास देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख. सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतम आबा माने पाटील, मल्ल सम्राट व्यायाम शाळेचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य ॲड. नागेश काकडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे, मेडदचे माजी सरपंच युवराजतात्या झंजे, उंबरे दहिगावचे माजी सरपंच विष्णूपंत नारनवर, गुलाबराव निंबाळकर, विकास रणशिंग, पैलवान दत्ता मगर, यशराज देशमुख, कीर्तीराज देशमुख, शामराव देशमुख, यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी शिवरत्नवरील मोहिते पाटील दोन गटांमध्ये दरी निर्माण झालेली होती. त्यामुळे शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाची पंचायत समितीवर सत्ता आलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा दोन गट वेगवेगळे होते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाच्या विरोधात फत्तेसिंह माने पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर, भाजपचे के. के. पाटील, शिवसेनेचे नामदेव नाना वाघमारे, स्वाभिमानी संघटनेचे अजित भैया बोरकर यांच्या समवेत निवडणुकीत उमेदवार उभे केलेले होते. शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. त्यामुळे शिवरत्नवरील मोहिते पाटील विरोधी असणाऱ्या गटातील अनेक नेते मंडळींनी दोन्ही गटाचे मनोमिलन करण्याकरता भाजपचे राजकुमार नाना पाटील, काँग्रेसचे प्रकाश बापू पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. रामदास देशमुख, पांडुरंगभाऊ देशमुख, शंकरनाना देशमुख, माणिक बापू वाघमोडे यांच्यासह तालुक्यातील नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये मनोमिलन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्या विरोधातील माळशिरस तालुक्यातील समविचारी दोन गटाचे मनोमिलन झालेले आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला समविचारी विरोधी गटातील सर्व नेते एकत्रित येऊन शंकरनाना देशमुख यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर वज्रमूठ बांधलेली आहे. त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटाला मोठे आव्हान उभे केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
¿Existe una mejor manera de localizar rápidamente un teléfono móvil sin que lo descubran? https://www.mycellspy.com/es/tutorials/how-to-locate-the-other-party-location-by-camera/
Very informative! Your insights are highly valuable. For additional details, check out: LEARN MORE. What are everyone’s thoughts?