उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अकलुज शहरातील अनेकांचा पक्ष प्रवेश होणार – अक्षयभैय्या भांड

माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय भैय्या भांड यांच्या समवेत अकलुज शहरातील पैलवान मारूती भाऊ आंबुरे व त्यांच्या जेष्ठ सहकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी माळशिरस तालुक्यातील राजकीय विषयांवर तसेच माढा लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. मारूती भाऊ आंबुरे हे पैलवानकी क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. या आगोदर त्यांनी शिवसेनेमध्ये काम केले आहे.


लवकरच पै. मारूती भाऊ आंबुरे यांचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. लवकरच आदरणीय अजितदादा पवार हे माळशिरस तालुका दौऱ्यावर येणार आहेत व त्या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष प्रवेश माळशिरस तालुक्यात होतील, असे मत अक्षयभैय्या भांड यांनी व्यक्त केले.
यावेळी पैलवान मारूती भाऊ आंबुरे, नाना दोरकर, विठ्ठल दोरकर, रामभाऊ भोसले, मोतीराम पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अमित देशमुख, ज्ञानेश्वर भिल्ले आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.