अनंतलाल दोशी व विरकुमार दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवे येथील रत्नत्रय संकुलनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मांडवे (बारामती झटका)
सदाशिवनगर येथील रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच व रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. विरकुमार (भैया) दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नत्रय इंग्लिश स्कूल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. महीर गांधी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुरंदावडे गावचे उपसरपंच देविदास ढोपे, सहसचिव अभिजीत दोशी, रत्नत्रय स्कूलचे अध्यक्ष प्रमोद भैया दोशी, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, प्रशांत दोशी, बबन गोफने, वसंत ढगे, आमदार रामभाऊ सातपुते यांचे स्वीयसहाय्यक हरिभाऊ पालवे, सुरेश धाईंजे, रत्नत्रय पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, अजय गांधी, संजय दोशी, सुरेश गांधी, रामदास गोफणे, दत्ता भोसले, चंद्रकांत तोरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी विविध संस्था व मान्यवरांच्या हस्ते विरकुमार दोशी यांचा सत्कार करण्यात आला. दोशी कुटुंब हे पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी जपत गावांमध्ये विविध माध्यमातून कार्य करत असतात. रत्नत्रय स्कूलच्या माध्यमातून नर्सरी ते बारावीपर्यंत मांडवे या गावी परिसरातील शेतकरी व गरीब घरातील विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये ज्ञानदान देण्याचे कार्य 16 वर्षांपासून करीत आहे. तसेच रत्नत्रय पतसंस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना पतपुरवठा करून त्यांना रोजगार देण्याचे काम करीत आहेत.

तसेच रत्नत्रय कॉम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना विविध कॉम्प्युटर कोर्स माफक फी मध्ये शिकवत आहेत. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शिकवणे, दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी यांना नाष्ट्याची व्यवस्था करणे, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे, दरवर्षी वृक्षारोपण करणे व रक्तदान शिबिराचेे आयोजन करणे असे विविध सामाजिक कार्य ते दरवर्षी करत असतात. याही वर्षी ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी महिला व पुरुष मिळून ८७ जणांनी रक्तदान करून सभाग नोंदवला. त्या सर्वांचे आभार संस्थापक अनंतलाल दादा दोशी यांनी मानले व सर्व रक्तदात्यांना एक आंब्याचे झाड भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्रीनिवास कदम पाटील, सुभाष सुदने, तुषार सानप, नवजीवन दोशी, जिनेन्द्र दोशी, किरण गांधी, श्रीकांत शहा, महावीर शहा, केतन दोशी, पांडुरंग माने, ज्ञानेश राऊत, सागर पालवे, संतोष शिंदे, सतिश बनकर अमित पाटील सर, दैवत वाघमोडे सर व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी तसेच रत्नत्रय पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng