“अभिरूप स्पर्धा परीक्षे” मध्ये दहिवडी येथील यज्ञेश देवकर केंद्रात प्रथम तर राज्यात चौथा
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
दहिवडी ता. माण, येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु. यज्ञेश विक्रम देवकर या विद्यार्थ्यांने अभिरुप स्पर्धा परीक्षेमध्ये १५० पैकी १४४ गुण मिळवून राज्यात चौथा व दहिवडी केंद्रात प्रथम येण्याचा सन्मान मिळविला. त्याचप्रमाणे हर्षवर्धन प्रशांत घनवट याने राज्यात आठवा व केंद्रात दुसरा तर प्रांजली विजय पाटील हिनेही यश मिळवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोसावी वस्ती येथील शाळेच्या यशाची परंपरा कायम टिकवली आहे.
त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे सल्लागार यशवंतराव साळुंखे, संभाजीराव गोरे यांनी या विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून कौतुक व अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती कदम व काटकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng