अमानत नागरी सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सभासदांना शेकडा १२ लाभांशची घोषणा
श्रीरामपूर (बारामती झटका) शौकतभाई शेख यांजकडून
अमानत नागरी सहकारी पतसंस्थेने सातत्याने मागील २७ वर्षापासून जनतेच्या हिताचा कारभार केला असून त्यामुळे सर्वच सभासदांचा विश्वास संपादन केलेली पतसंस्था अशी सहकारात ओळख निर्माण करणारी अमानत पतसंस्थेचे नाव अग्रेसर असल्याचे मत माजी नगरसेवक हाजी मुक्तार शाह यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन हाजी याकुबभाई बागवान होते.
अमानत पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील हाजी इब्राहीम एज्युकेशन ट्रस्टच्या अजमत फातेमा इंग्लिश स्कूलच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून हाजी मुक्तार शाह बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन हाजी याकुबभाई बागवान, ट्रस्टचे उपाध्यक्ष मुबीन शेख,माजी सभापती अकील शेख, माजी सभापती रियाज पठाण, व्हा. चेअरमन हाजी इब्राहीमभाई कुरेशी, ऍड. मुमताज बागवान, माजी नगरसेवक कलीम शेख, डॉ. शाह, अय्याज तांबोळी, मुजफ्फर शेख आदि उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक तज्ञ संचालक शकील बागवान यांनी केले. अध्यक्षपदावरुन बोलताना याकुब बागवान म्हणाले की, संस्थेचा व्यवहार उत्तम दर्जाचा असल्याने सभासदांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. सभासदांच्या हितासाठी कोअर बँकिंग सुरू करीत आहे. सर्वसाधारण व्यवसायिकांना व्यवसाय करता यावा म्हणून व्यवहारात सुविधा देण्यात येणार आहेत. बँकेला झालेल्या नफ्यातून सर्व सभासदांना यावर्षी शेकडा १२ लाभांश देण्यास सभागृहाने एकमुखी मान्यता दिली आहे.
सभासदामधून मुजफ्फर शेख यांनी संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याप्रसंगी पतसंस्थेकडून महिला सदस्यांना मिळत असलेली वागणूक ही मान उंचवणारी आहे, असे गौरवोदगार ऍड. मुमताज बागवान यांनी आपल्या भाषणात केले.
याप्रसंगी दैनिक बचत ठेव योजना प्रतींनिधी सर्व कर्मचारी यांना गृहपयोगी वस्तू भेट देण्यात आली. यावेळी संचालक वसंतलाल भंडारी, साजिद मिर्झा, जलील शेख, हनिफ तांबोळी, जमीर बागवान, गणपत गांगुर्डे, समीर बागवान, सलीम शेख, शकुर शेख, अर्जुन अडांगळे, मेहरून्निसा शेख, नसरीन शेख सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन शाखाधिकारी सुलताना शेख व वैशाली वारे यांनी केले तर हनिफ तांबोळी यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng