अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी – रिपाइंची मागणी
माळशिरस (बारामती झटका)
रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, वेगवान वादळी वारे व प्रचंड गारपिटीमुळे माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या सिझनमधील हातातोंडाला आलेले पिक मका, ज्वारी, केळी, डाळींब, तोंडले, द्राक्ष यांसह विविध फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महागाई व पिकांवरील विविध रोग या खर्चाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात हे आस्मानी नैसर्गिक संकटाने शेतक-यांचे नियोजन कोलमडून कंबरडेच मोडल्याची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा संकटकाळात कृपया माळशिरसचे कर्तव्यदक्ष महसूली अधिकारी म्हणून आपण तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पारीत करून विनाअट सरसकट तालुक्यातील गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निःपक्ष व दिलासादायक नुकसान भरपाई मिळणेकामी वरिष्ठांसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशा मागणीचे निवेदन रिपाइंच्यावतीने देण्यात आले. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सदरचे निवेदन माळशिरसचे निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी स्वीकारले. यावेळी पंचनाम्याचे कामकाज येत्या दोन दिवसात पुर्ण करणार आहोत, असे आश्वासन तहसीलदार देशमुख साहेब यांनी दिले आहे.
यावेळी जिल्हा युवा कार्याध्यक्ष किरण धाईंजे, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, तालुका कार्याध्यक्ष समाधान भोसले, तालुका सरचिटणीस मारूती खांडेकर, युवा तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे, युवक सरचिटणीस प्रवीण साळवे, रमेश धाईंजे, जेष्ठ नेते तुकाराम बाबर, एस. एम. गायकवाड, शामराव भोसले, भारत आठवले, आबा बनसोडे यांच्यासह तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके, तालुका उपाध्यक्ष शेखर सावंत, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे, संघटक प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुनील ओवाळ, तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे, प्रसिद्धी प्रमुख मारुती शिंदे, मळोली अध्यक्ष सोमनाथ वाघमारे, माळशिरस शहराध्यक्ष पुष्कर धाईंजे, सचिन सोनवणे, गौरव बाबर, मसू चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng