अहिल्याबाई होळकर हिंदुस्थानचा स्वाभिमान – महेश चिवटे
करमाळा (बारामती झटका)
अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कृतीतून स्वाभिमानाने जगण्याची प्रत्येक स्त्रीला हिंमत दिली. प्रत्येक व्यक्तीने अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचले तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या जीवनात मार्ग बदल होऊ शकतो, असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.
करमाळा शिवसेनेचे मुख्य कार्यालयात आज अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णा सुपनवर, वस्ताद अजिनाथ कोळेकर, पत्रकार सचिन जवेरी, दिनेश मडके, नासिर कबीर, अशपाक सय्यद, विशाल घोलप, काय सांगता चे संपादक अशोक मुरूमकर, तेजवार्ता चे संपादक विशाल परदेशी, हिवरवाडीचे सरपंच राजेंद्र मिरगळ, जयवंतराव जगताप युवा मंचचे तालुकाध्यक्ष जयराज चिवटे, देवळालीचे चंद्रकांत चव्हाण, शाखाप्रमुख मारुती भोसले, निलेश चव्हाण, आजिनाथ इरकर आदी उपस्थित होते.
यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अण्णा सुपनवर, पवनपुत्र चे संचालक दिनेश मडके यांनी व्याख्यान दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read with a touch of humor! For further details, check out: READ MORE. What are your thoughts?