आई महोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक वर्तुळात समृद्ध भर घालणारा ठरेल – चंद्रकांतदादा पाटील
‘आई महोत्सव २०२२’ च्या बोधचिन्हाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते अनावरण
पुणे (बारामती झटका)
वृंदावन फाउंडेशन व स्त्री शक्ती संस्था पुणे यांच्यावतीने मातृप्रेमाचे महामंगल स्त्रोत समजल्या जाणाऱ्या ‘आई’ या विषयावर आधारित पहिला आई महोत्सव एरंडवणे, पुणे येथे आयोजित केला जात आहे. या दोन दिवशीय महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई, महामाता रमाई आदि मातांचा आदर्श समाज मनाला नेहमीच प्रेरणा देणारा राहिला आहे. संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय असलेली भारतीय कुटुंब संस्था ही घराघरातील ‘आईं’ नींच सांभाळलेली आहे. त्यांच्याच कार्यकर्तुत्व आणि त्यागमय जीवनाचे दर्शन घडविणारा ‘आई महोत्सव’ तरुणाई करिता प्रेरणादायी राहणार आहे. ‘आई महोत्सव’ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वर्तुळात भर घालेल, असा मनोदय व्यक्त करत त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.


‘आई’ या विषयावर आधारित विविध कार्य परिघातील मान्यवर मंडळी व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत व सांस्कृतिक कलाविष्कार इत्यादी माध्यमातून आपल्याला भेटणार आहेत.
हा सोहळा म्हणजे पुणे नागरिक बंधू भगिनींना एक मेजवानी असणार आहे. याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस स्वागताध्यक्ष गायत्री भागवत, प्रसाद राहूरकर, कवी फुलचंद नागटिळक, शुभम राहूरकर, प्रतीक यादव, शुभम देडगावकर, नितीन खत्री आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
