Uncategorizedआरोग्यताज्या बातम्याराजकारण

आठ दिवसात पाच रुग्णांना साडेतीन लाखाची मदत

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी

करमाळा (बारामती झटका)

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून गेल्या आठ दिवसांत करमाळा तालुक्यातील पाच रुग्णांना एकूण साडेतीन लाख रुपयांची आर्थिक मदत संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली असून या योजनेचा तालुक्यातील जनतेला मोठा उपयोग झाल्यामुळे रुग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे.

करमाळा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रोहित वायबसे, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे, सहसमन्वयक शिवकुमार चिवटे, रुग्ण सहाय्यक नागेश शेंडगे या कार्यकर्त्यांनी संबंधित रुग्णांचे कागदपत्र घेऊन विहित नमुन्यात अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षात जमा करून ही निधी मिळून देण्यास प्रमुख भूमिका बजावली.

भुजंग कृष्णाजी गीते रा. वंजारवाडी यांना गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी ५० हजार रु. मदत झाली आहे. सुमित्रा पोपट खराडे रा. मोहल्ला गल्ली, करमाळा या मुलीला १ लाख रुपयाची मदत झाली.
मंगल अप्पाराव घुले यांना ५० हजाराची मदत झाली आहे. नारायण गुरुदेव इंगळे, रा. कंदर तर यशोदा बाळासाहेब जाधव, रा. वीट यांना एक लाख रुपयाची मदत झाली आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांचे करमाळा स्वतंत्र ऑफिस असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला सविस्तर माहिती देऊन संबंधित रुग्णाचा अर्ज भरून घेऊन हा अर्ज ऑनलाइनने मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो. व याचा संपूर्ण पाठपुरावा करून शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कार्यकर्ते संबंधित रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. ज्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाची मदत हवी असेल त्यांनी करमाळा येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आव्हान रोहित वायबसे यांनी केले आहे

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, करमाळा या कार्यालयातून परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो. येणाऱ्या रुग्णाला संपूर्णपणे सखोल माहिती दिली जाते व संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटल वरच्या खात्यावर रक्कम पोहोच करेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो‌. गेल्या सहा महिन्यात शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष करमाळा या कार्यालयातून जवळपास ४० लाख रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना मिळवून देण्यात आली आहे. रुग्णांना त्यांच्या बिलात सवलत मिळवून देण्यासाठी शिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधील दहा टक्के हातामधील जागा रुग्णांना उपलब्ध करून देण्यास आम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहोत. – महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button