Uncategorizedआरोग्यताज्या बातम्या

आठ दिवसात ३ लाख १५ हजार रुपयांची रुग्णांना मदत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी

वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधण्याचे दीपक पाटणे यांचे आवाहन…

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेली आठ महिन्यात करमाळा तालुक्यातील रुग्णांना ७० लाखापर्यंत मदत झाली असून गेल्या आठवड्यात पाच लाभार्थ्यांना ३ लाख १५ हजार रुपयांची मदत झाल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे व शहर समन्वयक शिवकुमार चिवटे यांनी दिली आहे.

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून मदतीकरिता आलेल्या रुग्णांचा ऑनलाइन अर्ज घेण्यापासून सर्व कामे व मार्गदर्शन या कार्यातून केले जाते. शिवाय महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार असलेल्या रुग्णालयातून रुग्णांना मोफत उपचार करून दिले जातात. पंतप्रधान वैद्यकीय मदत योजना, सिद्धिविनायक गणपती मंदिर मदत योजना, आदी ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. वैद्यकीय कक्ष करमाळा कार्यालय प्रमुख रोहित वायभासे 9067171514 यांच्याशी सर्वांनी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली रुग्णांची नावे व मदत मिळालेली रक्कम –

वैभव भास्कर शिंदे करमाळा, सोलापूर संचेती हॉस्पिटल पुणे येथे १ लाख रु. अर्थसहाय्य मिळाले, कमलेश नवनाथ क्षीरसागर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे ५० हजार रु., सलमा आली आतार सिद्धी स्पेशालिटी हॉस्पिटल घाटकोपर येथे ४० हजार रु., सुप्रिया सुखदेव लष्कर ४० हजार रु., पुनमचंद शंभर साबळे माणिक हॉस्पिटल संभाजीनगर ५० हजार रु., मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेतून या सर्व रुग्णांना ऑनलाइन अर्ज भरण्यापासून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे काम करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Great job on this piece! It was very informative and engaging. I’m eager to hear different perspectives on this. Click on my nickname for more engaging content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button