आदिनाथ कारखान्याचे नुकसान करणाऱ्या प्रभारी कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांची हकालपट्टी करा – कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव मस्के यांची मागणी
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथमधील कामगारांची पगारीपोटी तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने शिखर बँकेत बाजूला ठेवले असून या रक्कमेमधून सर्व कर्मचाऱ्यांना समान तीन पगारी वाटप कराव्यात, या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे एकमत असून प्रभारी कार्यकारी संचालक बागनवर स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी कर्मचाऱ्यात भांडण लावून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधत आहेत. तात्काळ प्रशासकीय संचालक मंडळांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव मस्के यांनी केली आहे.
आदिनाथ कारखाना बंद पाडणे हे बागनवर यांचेच पाप आहे, चालू सीजनमध्ये सुद्धा बॉयलरच्या दुरुस्तीच्या कामासाठी एक कोटी 46 लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मॉलिशियस वाहतूक करणारी नळी चांगली असताना केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी 67 लाख रुपये या नवीन नळीसाठी खर्च करण्यात आले. कारखान्याला गरज नसलेले जवळपास एक कोटी रुपयांचे पाईप व इतर सामान खरेदी केले असून हे सामान कारखान्याच्या गोडाऊनमध्ये गेली सहा महिन्यापासून पडून आहेत.
शिखर बँकेकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राखीव असलेली रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीन पगारी देण्यात याव्यात, याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना राजकीय कुरघोडी करून निलंबित केले आहे किंवा कामावरून काढले आहे अशा लोकांना कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे. ठराविक दोन-चार कर्मचारी पद व हुद्दा वाढवून पगारी वाढून वेळेवर करून घेत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आदिनाथ कारखाना बंद असताना या ठराविक कर्मचाऱ्यांनी स्वतःची पदोन्नती करून कारखाना लुटण्याचे काम केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे केलेली पदोन्नती रद्द करावी.
आता प्रशासकीय मंडळ शासनाने नेमले असून या संचालकांनी कोणताही राजकीय भेदभाव न करता सर्व कर्मचाऱ्यांना सामान्य द्यावा, कामगारांच्या पगारीसाठी राखीव असलेली तीन कोटी सत्तर लाखाची रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना सम प्रमाणात देऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कामगार नेते महादेव मस्के यांनी केली आहे.
बागनवर हे प्रभारी कार्यकारी संचालक आहेत. ठराविक संचालकांना हाताशी धरून आदिनाथ मध्ये त्यांनी चार वर्षाच्या काळात प्रचंड गैर कारभार व भ्रष्टाचार केला केला असून याची चौकशी करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सुद्धा महादेव मस्के यांना दिला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read with a touch of humor! For further details, check out: READ MORE. What are your thoughts?