Uncategorizedताज्या बातम्या

आनंदाची बातमी – भांब गावचे थोर सुपुत्र भिमराव संभाजी काळे यांची म्हाडाच्या उपमुख्य अभियंता पदी पदोन्नती

शेतकरी कुटुंबातील भीमराव काळे यांची कनिष्ठ अभियंता ते उपमुख्य अभियंता पदावर बढती मिळाल्याने भांब ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन

भांब ( बारामती झटका )

भांब ता. माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील भीमराव संभाजी काळे यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडाच्या उपमुख्य अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे. भांब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्य अभियंता पदावर बढती झालेले व अन्य विभागांमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या नागरी सत्काराचे आयोजन रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी चार वाजता ग्रामदैवत संभाजी बाबा दरा, भांब येथे संभाजी बाबा दरा कुस्ती समिती व समस्त भांब ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भांब हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीमध्ये वसले आहे. अतिशय दुर्गम परिसर, डोंगर कपारीने वेढलेले भांब गाव आहे. अशा गावामध्ये शेतकरी व मेंढपाळ असणारे रखमाबाई व संभाजी काळे या दाम्पत्यांच्या पोटी भीमराव काळे यांचा जन्म दि. 01/06/1967 साली झालेला आहे. संभाजी काळे यांना निवृत्ती, भीमराव, शिवाजी, किसन अशी चार मुले तर मुक्ताबाई छगन रुपनवर फडतरी, कौसाबाई कोडलकर फोंडशिरस, कुसाबाई माने पळसमंडळ अशा तीन मुली आहेत.

संभाजी काळे यांची पूर्वीच्या काळी अतिशय प्रतिकूल व हलाकीची परिस्थिती होती. अशा कठीण व अडचणीच्या काळात भीमराव काळे यांनी पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांब येथे शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावी सदाशिवराव माने विद्यालय माणकी येथे शिक्षण पूर्ण केले. शासकीय विद्यानिकेतन अभियांत्रिकी कॉलेज कराड येथे डिप्लोमा पूर्ण केला. आणि 1987 साली वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडा मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यांनी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, शाखा उप अभियंता, कार्यकारी अभियंता या पदावर काम केलेले असून सध्या भिमराव काळे यांना उपमुख्य अभियंता पदावर बढती मिळालेली आहे. भीमराव काळे यांनी नोकरी करीत 2007 साली डिग्री प्राप्त केलेली आहे, त्यामुळे त्यांना बढती मिळत गेली.

समाजामध्ये आपण पाहतो हम दो हमारे दो परंतु भीमराव काळे यांनी आपल्या परिवारातील शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या भावंडांची मुले सुद्धा इंजिनियर करून स्वतःची मुले सुद्धा इंजिनियर केलेली आहे. भीमराव काळे यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी वृषाली इंजिनीयर आहेत. सध्या वृषाली विवाहित आहे. ज्येष्ठ बंधू निवृत्ती यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांची दोन मुले व लहान बंधू शिवाजी यांचीही दोन मुले इंजिनियर केलेले आहेत. लहान बंधू किसन हे मुंबई पोलीस आहेत. त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.

भीमराव काळे यांनी मुंबई येथे नोकरी करीत असताना परिवारावर ज्याप्रमाणे लक्ष दिले, त्याचप्रमाणे आपण ज्या परिसरामध्ये वाढलो खेळलो त्या परिसराला सुद्धा विसरले नाहीत. ग्रामदैवत संभाजी बाबा दरा परिसर विकसित करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.

पूर्वीच्या काळी संभाजी बाबा दरा येथे मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान सुरू होते. मात्र, सदरचे मैदान गेली पस्तीस वर्ष बंद होते. गावातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने 2017 पासून पुन्हा संभाजी बाबा येथील कुस्ती मैदान भीमराव काळे यांच्या प्रयत्नाने सुरू झाले आहे. भांब परिसरामध्ये सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे उपमुख्य अभियंता पदावर बढती झाल्यानंतर संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती व समस्त भांब ग्रामस्थ यांच्यावतीने भीमराव काळे यांना सन्मान चिन्ह व भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याच वेळी प्रशासनामध्ये काम करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये रामचंद्र धोंडीबा खरात, छगन दाजीराम काळे, जालिंदर दाजीराम काळे, तात्या बापू काळे सर गिरवी, अंबादास रामा काळे, दत्तू काका काळे, हनुमंत सिताराम काळे, आबा गंगाराम काळे, दादा शंकर गोरड, सोनबा नागू काळे, श्रीरंग भागुजी सिद, मधुकर दादा काळे, भगवान तात्याबा कांबळे, मधुकर गुंडीबा पांढरे, दिगंबर दादा काळे, शंकर खरात, विष्णू राघू काळे, अण्णा महादेव कांबळे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास भांब व भांब परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती व समस्त भांब ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

  1. jago88 jago88 jago88
    Heya i am for the first time here. I found this board and I find It truly useful & it helped me out much.
    I hope to give something back and aid others like you helped me.

  2. I have been browsing online more than three hours today,
    yet I never found any interesting article like yours. It’s pretty
    worth enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made good content
    as you did, the net will be much more useful than ever before.

  3. Heya i am for the first time here. I found this board and I find It truly useful & it helped me out a
    lot. I hope to give something back and help others like you helped me.

  4. It’s perfect time to make a few plans for the longer term and it
    is time to be happy. I have read this submit and if I may I desire to counsel you few
    interesting things or suggestions. Perhaps you can write subsequent articles referring to this article.
    I want to read more things approximately it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button