आपली वीज आपला विकास या उपक्रमांची माळशिरस मधुन सुरुवात
माळशिरस (बारामती झटका)
वीज ही आजच्या काळात आपल्या शेतकऱ्यांचा आत्मा आहे. वीज वापर व्यवस्थित करुन वेळेवर वीज बील भरले आणि वीज चोरीला आळा घातला तर, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीने वाढेल, शेतकऱ्यांचा विकास होईल, असे आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी माळशिरस येथे शेतकऱ्यांच्या मिटिंगमध्ये सांगितले.
आपली वीज आपला विकास हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे धोरण आपला युवक शेतकरी फोरम यांनी हाती घेतलेले आहे. त्यासाठी दि. १२/०९/२०२२ रोजी माळशिरस येथील प्रगतशील शेतकरी महादेव पिसे व अभिजीत पिसे यांनी शेतकऱ्यांची मिंटीग घेतली होती. त्या मिटींगला प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरसचे नगराध्यक्ष डाॅ. आप्पासाहेब देशमुख हे उपस्थित होते. शेतकऱ्यांना अखंडीत १८ तास वीज मिळावी यासाठी आपला युवक शेतकरी फोरम मार्फत गेली वर्षभर सरकार दरबारी प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना अखंडीत वीज दिली तरच शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. त्यासाठी शेतकरी आणि महाराष्ट्र राज्य विज महावितरण यांच्यात समन्वय व्हावा, संवाद व्हावा, एकमेकांच्या अडचणी समजावून घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी लवकरच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी यांची एकत्रित मिटींग घेण्याचे संकेत ॲड. एम. एम. मगर यांनी दिले.
सदर मिटिंगसाठी माळशिरसचे नगराध्यक्ष व शेतकरी एम. बी. पंचवाघ, संदीप इंगोले सर, माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे, वसंतराव आदट, गंगाधर पिसे, जगन्नाथ गेजगे, नंदकुमार मस्के, शिंदे महाराज, पांडुरंग पिसे, आबा फडणवीस, महादेव पिसे, अभिजीत पिसे, सलिम पठाण, गणेश कुलकर्णी, सोमनाथ सरगर असे विविध भागांतील शेतकरी हजर होते.
सदर मिटिंगला हजर राहुन सहकार्य करण्याबाबत नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी आश्वासन दिले व मिंटिगला हजर असणा-या सर्व शेतकऱ्यांत जागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.सदर मिटिंगमध्ये नगराध्यक्ष व वरीलप्रमाणे हजर असलेले शेतकरी यांचे स्वागत व सत्कार आपला युवक शेतकरी फोरमचे संघटक अभिजित पिसे यांनी केले. तर सुत्रसंचालन सोमनाथ सरगर सर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I thoroughly enjoyed this article. The author’s perspective was fascinating and left me with a lot to think about. Let’s dive deeper into this subject. Click on my nickname for more insights!