पोखरापुर जिल्हा परिषद गटात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे उतरणार मैदानात

मोहोळ (बारामती झटका)
मोहोळ नगरपालिका निर्मिती पूर्वी मोहोळ व पोखरापुर अशा दोन पंचायत समिती मिळून मोहोळ जिल्हा परिषद गट होता आणि शिवसेना भाजपा युती सतत तिथे जिंकत राहिली होती. मात्र मोहोळ नगरपालिका निर्मिती नंतर नव्यानेच निर्माण झालेला पोखरापुर जिल्हा परिषद मतदारसंघ हा तालुक्यातील एकमेव ओबीसी राखीव झाला आहे. बाकी सर्व गट सर्वसाधारण जाहीर झाले आहेत.
यावेळेस भाजपला अनुकूल असणारा या गटात भाजपाचा उमेदवार म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांचा दावा असू शकतो. असा अंदाज या मतदार संघातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी नव्याने रचना झालेल्या या गटात एक पंचायत समिती ही सतत प्रस्थापितांच्या विरोधातील तर दुसरी पंचायत समितीमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रभावात असल्याचे दिसत आहे. वडाचीवाडी, गलंदवाडी, पासलेवाडी, बीटले अशी काही गावे राजन पाटील यांच्या प्रभावाखाली यांचा समावेश झालेली आहेत. शंकरराव वाघमारे यांच्या रूपाने मोहोळ तालुक्यातील प्रथमच कमळ चिन्हावर भाजपाचा पहिला पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तसेच सौंदणे ग्रामपंचायत निवडणूकित त्यांनी पाच वर्ष सरपंच म्हणून व भाजपाचा पहिला सरपंच म्हणून काम केले आहे. गेल्या सहा निवडणुकीत सौंदणे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी भाजपाच्या गटाचे प्रतिनिधित्व ठेवले आहे . स्वतः पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील काम केले आहे. मागील वेळी टाकळी सिकंदर जिल्हा परीषद गटातून त्यांनी कडवी झुंज दिली होती. थोड्या मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. मात्र तो गट वेगळा होता. आता नवीन रचनेत त्यांचे सौंदणे हे गाव व त्यांचा प्रभाव असणारी काही गावे यावेळी पोखरापुर जिल्हा परिषद गटात आहेत. त्यामुळे त्यांनी पोखरापुर जिल्हा परिषद लढण्याची तयारी सुरू केली असून संघटन कौशल्याच्या जीवावर आपली दावेदारी दाखल केली आहे.
पोखरापुर जिल्हा परिषद गटात १७ गावे येतात. यामध्ये पोखरापुर व सय्यद वरवडे हे दोन पंचायत समिती गण येतात. यामध्ये सय्यद वरवडे गणात सौंदणे, तांबोळे, सय्यद वरवडे, ढोकबाभुळगाव, वडवळ, नजिक पिंपरी, राम हिंगणी तर पोखरापुर पंचायत समिती गणात पोखरापुर, खवणी, कोन्हेरी, यावली, चिखली, हिवरे, वडाची वाडी, बिटले, गलंदवाडी, पासलेवाडी या गावांचा समावेश आहे.
श्री. शंकरराव वाघमारे हे विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवून आणि पक्षाचे सर्व कार्यक्रम सातत्याने उत्कृष्टपणे करत असतात. देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे येथील सिंचनाचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, विजेचा प्रश्न असे सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून सोडविले जावू शकतात. पक्षासाठी वाघमारे यांनी दिलेले योगदान पाहता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार आणि प्रदेश व जिल्हा स्तरावर संघटनेत काम करणारे सर्व पदाधिकारी यांचेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्यात अडचण येणार नाही, असे बोलले जात आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी दोन्ही वेळेला सर्वांना सोबत घेवून तेथून चांगले मताधिक्य पक्षाला दिले होते.
प्रचंड संघटन कौशल्य, शांत, संयमी, अभ्यासू, आणि उत्तम वक्तृत्व यांच्या जोरावर त्यांची पोखरापुर या जिल्हा परिषद गटात प्रभावी दावेदारी मानली जात आहे.
मोहोळ तालुक्यातील मातब्बर नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांच्या हजारो समर्थकांसह त्यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपा नगरपालिका निवडणुकीत नंबर वन वर राहील, तसाच कौल जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये देखील मोठा प्रभाव राहू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



