आमदार प्रणितीताई शिंदे यांचा पानिवकर पाटील यांच्यावतीने ॲड. अभिषेकभैय्या पाटील यांनी सन्मान केला.
माळशिरस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय शामरावभाऊ पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली.
सोलापूर ( बारामती झटका )
केंद्रीय माजी गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांची कन्या आमदार प्रणितीताई शिंदे यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे युवा नेते श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अभिषेक भैय्या प्रकाशराव पाटील यांनी सोलापूर येथील संपर्क कार्यालयात सन्मान केला.
माळशिरस तालुक्यातील पानीवकर पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. स्वर्गीय शामरावभाऊ पाटील यांनी प्रस्थापितांचे साम्राज्य उध्वस्त करून पहिल्यांदा माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत दैदिप्यमान विजय संपादन केलेला होता. स्वर्गीय शामरावभाऊ यांनी राजकारणाला वेगळी कलाटणी देणारे राजकारण माळशिरस तालुक्यात सुरू केलेले होते. श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्षपद अनेक वर्ष भूषविलेले आहे. श्रीराम शिक्षण संस्थेच्या माजी सचिव, पंचायत समितीच्या माजी सदस्या पानिव गावच्या माजी सरपंच सौ. श्रीलेखाताई प्रकाशराव पाटील यांनी पानीव गावामध्ये महिलाराज निर्माण केलेले होते. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याची नोंद झालेली आहे. राजकारणाबरोबर पाटील परिवार यांनी उद्योग व्यवसाय यामध्ये डॉक्टर सुनीलकाका पाटील यांनी उंच भरारी घेऊन माळशिरस तालुक्याचे नाव उज्वल केलेले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये पानिव गावाची नव्याने ओळख श्रीराम शिक्षण संस्था मार्फत आधुनिक शिक्षणामध्ये झालेली आहे.
माजी आमदार स्वर्गीय शामरावभाऊ यांचा राजकीय वसा व वारसा प्रकाशबापू पाटील व सौ. श्रीलेखा पाटील यांनी जपलेला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या परिवाराशी पानीवकर पाटील यांचे राजकीय नाते घट्ट जोपासलेले आहे. सध्या तिसरी पिढी उद्योग, व्यवसाय, शिक्षण याबरोबर राजकारणात सक्रिय झालेली आहे. युवा नेते ॲड. अभिषेकभैय्या पाटील यांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचा सन्मान करून पानीवकर पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात जनतेच्या सेवेसाठी सक्रिय झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng