आमदार यशवंत माने यांचा बाजार समितीच्या संचालक बिनविरोध निवडीनिमित्त सत्कार
वडापुरी (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी मोहोळचे आमदार यशवंत माने यांची निवड बिनविरोध झाल्याने लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन व दै. जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी आमदार माने यांचा शिवाजी पवार पञकार, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष, ललेंद्र शिंदे यांच्याहस्ते पुष्प गुच्छ, पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे सेवक असल्याने व लोकप्रिय असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यांची कृषी बाजार समितीवरील निवड सार्थ निवड आहे.
यानंतर मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे म्हणाले की, श्री. माने हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामान्य शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत. आमदार माने शेतकऱ्यांचा कणा होतील आणि विस्कटलेल्या जीवनाची घडी पुन्हा नीट बसवतील, असा आशावाद त्यांनी बोलताना निर्माण केला.
आमदार यांनी आलेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी अरविंद ढावरे, दत्ता काळेल आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng