आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे भाजपमध्ये प्रमोशन का ? डिमोशन ?, राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुखांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे माढा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलेली आहे. आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावर विधानसभेची जबाबदारी देऊन भाजपमध्ये प्रमोशन का ? डिमोशन ?, अशा चर्चेला राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलेले आहे. कारण बार्शीची जबाबदारी आमदार राजेंद्र राऊत यांच्या चिरंजीवाकडे आहे. सांगोल्याची जबाबदारी चेतन केदार यांच्याकडे आहे. अशा नवोदित व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या यादीत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नाव आलेले आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पद होते. राष्ट्रवादीत गेल्यानंतर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष पद होते. विधान परिषदेवर आमदार व राज्यसभेत खासदार म्हणून काम केलेले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चेअरमन पद देखील सांभाळलेले होते. सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. एक वेळा आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, चेअरमन अशा पदावर राष्ट्रवादीत काम करणाऱ्या व्यक्तीला माढा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलेली असल्याने प्रमोशन की ?, डिमोशन ?, अशी चर्चा सुरू आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमदार म्हणून काम पाहिलेले. सोलापूर जिल्हा दूध संघावर चेअरमन पद सांभाळलेले. एकेकाळचे मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते असणारे माजी आमदार प्रशांतमालक परिचारक यांच्याकडे माढा लोकसभा मतदार संघाची मोठी सहा मतदार संघ व इतर तालुक्यातील गावांची जबाबदारी आहे. त्यांचे पक्षाने प्रमोशन केलेले असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे भाजपमध्ये प्रमोशन का ? डिमोशन ?, याचेही मोहिते पाटील समर्थक यांनी संशोधन करावे, अशी विरोधकांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me laughing and learning! For those interested, check out: DISCOVER HERE. What’s your take?