आमदार संजय शिंदे यांचा आसरा घेऊन उद्धव माळी याने खोदली पाझर तलावात विहिर, आरपीआयचे आभिमान गायकवाड यांची तक्रार
उपवनसंरक्षक वन्य प्राणी जागेवर अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करा
लऊळ (बारामती झटका)
उपवनसंरक्षक वन्य प्राणी पुणे विभाग उपळवाटे, ता. माढा येथे मालकीची गट नंबर 177 पैकी पाझर तलाव संपादनासाठी दोन हेक्टर दोन आर या गटात सुदाम श्रीपती माळी आणि उद्धव श्रीपती माळी यांनी विहीर खोदून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. तसेच विजेचा वापर करून त्या ठिकाणी विद्युत पंप टाकून आपल्या शेतातील पिकासाठी पाणी उचलले जाते.
गट नंबर 178/2 माढा तालुक्यातील उपळवटे हा पाझर तलावासाठी आरक्षित असून या ठिकाणी विहीर खोदून खाजगी शेतीला पाणी नेण्यासाठी पाझर तलावात अतिक्रमण करून विहीर खोदलेली आहे. त्या ठिकाणी विद्युत पंप टाकलेला आहे. या विहिरीतून उद्धव श्रीपती माळी व सावता श्रीपती माळी हे आपल्या शेतात पाणी नेत आहेत. तरी पाझर तलावात केलेल्या शासकीय जागेतील अतिक्रमण त्वरित काढावे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि दंड न भरल्यास त्यांच्या शेतजमिनीवरती शासनाचा बोजा टाकण्यात यावा. त्यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, अन्यथा आम्हाला कोर्टात त्यांच्याविरोधात दाद मागवी लागेल, याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन मा. सोलापूर जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर विभाग, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मोडनिंब, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद सोलापूर, वन विभाग अधिकारी सोलापूर, तहसील कार्यालय माढा, प्रांताधिकारी कुर्डूवाडी, गाव तलाठी कामगार, उपळवाटे ग्रामसेवक, ग्रामपंचायत उपळवटे यांना देण्यात आले आहे. निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
तरी शासनाच्या मालकीच्या असणाऱ्या या गटात केलेले अतिक्रमण त्वरित काढावे. वेळोवेळी निवेदन दिली आहेत. शासनाने विहीर ताब्यात घेऊन त्या व्यक्तीकडून शासनाचा दंड वसूल करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या निवेदनातून रिपब्लिकन पार्टीचे अभिमान गायकवाड यांनी केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng