आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे तालुका अध्यक्षपदी पप्पू उर्फ मिलिंदजी सरतापे यांची तर समाधानजी भोसले यांची माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अजित साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांची पदाधिकारी निवडीची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये तालुका अध्यक्षपदी मिलिंदजी सरतापे यांची तर कार्याध्यक्षपदी समाधानजी भोसले यांच्यासह अनेकांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये काम करणारे सरतापे व भोसले यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng