छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वेळापूर चौकातील पुतळे हटवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवप्रेमी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भिमसैनिक यांच्या मनाच्या मोठेपणाचे दर्शन पाहावयास मिळाले.
वेळापूर ( बारामती झटका )
आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वेळापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे गेली अनेक वर्ष होते. आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. महामार्ग करीत असताना पुतळ्यांची अडचण येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवप्रेमी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भिमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने विधीवत व सन्मानाने पुतळे काढून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. शिवप्रेमी व भीमसैनिक यांच्या मनाचा मोठेपणाचे दर्शन पाहावयास मिळालेले आहे.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वेळी पालखीचा मुक्काम परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांचे वास्तव्य आणि जगाच्या पाठीवर एकाच पिंडीवर अर्धनारी नटेश्वराचे मूर्ती असणारे हेमाडपंथी मंदिर आठवडा शनिवारी बाजार दिवस अनेक शासकीय कार्यालय वेळापूरमध्ये आहेत. पुणे-पंढरपूर व इंदापूर-अकलूज-सांगोला रस्ता मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारे होते. पालखी महामार्गामध्ये पुतळे इतरत्र हलविले जाणार आहेत. वेळापूर एसटी स्टँड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा आहे. सर्वच महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारणी केल्यानंतर महापुरुषांचे पावित्र्य व विटंबना होणार नाही. सर्व जाती-धर्मांमध्ये एकता नांदेल, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng