Uncategorizedताज्या बातम्या

आरोग्यमंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेतच – दिग्विजय बागल

सोलापूर (बारामती झटका)

आदिनाथ सहकारी साखर कारखाना तालुक्यातच राहिला पाहिजे व त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सभासदच कारखान्याचे मालक राहिले पाहिजेत, या भूमिकेतून येणाऱ्या आदिनाथच्या निवडणुकीत आपण दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट मत बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.

प्रसार माध्यमांशी पुढे बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, आदिनाथ कारखान्याला दहा कोटी रुपयाची मदत आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्यामुळे कायदेशीर अडचणी पार पडल्या. व कारखाना सक्षमपणे सुरू झाला. हे मार्केट कमिटीचे संचालक पद कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली. यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व म्हणून काम करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेमंडळीची आमचे सलोख्याचे संबंध आहेत. आदिनाथ कारखाना निवडणूक संदर्भात आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचा आदेश सर्वमान्य राहणार आहे. वेळप्रसंगी दोन पावले मागे घेण्याची सुद्धा आपली तयारी आहे. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांना राज्याच्या वतीने आम्ही देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना या यादीत का नाही, असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.

एकनाथ शिंदे साहेब यांचे आदिनाथ व करमाळा तालुक्यावर प्रचंड प्रेम असल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांचे नेतृत्व खालील सरकारमध्ये धाडसी निर्णय होत असून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लागत आहेत. यामुळे आदिनाथ व मकाई या दोन्ही कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प व वीज निर्मिती प्रकल्प लवकरच प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून देणार आहोत.

मी आपल्या घरावरील भगवा झेंडा असून तो मी कदापी खाली उतरवणार नाही. आदिनाथ हे सहकार्याचे मंदिर असून करमाळा तालुक्याचे स्वाभिमान आहे. या कारखान्याची सत्ता तालुक्यातील नेते मंडळींच्या हातात राहिली पाहिजे तरच, खऱ्या अर्थाने सभासद या कारखान्याचा मालक राहणार आहे. यासाठी या निवडणुकीत दोन पावले मागे घेण्याची वेळ आली तर आमची तयारी असणार आहे.

करमाळा एमआयडीसीमधील नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी आपण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रयत्न करीत असून उद्योगाचे जाळे निर्माण झाले तरच करमाळ्याची प्रगती होणार आहे.

करमाळा नगरपालिकेत विकासात्मक, रचनात्मक काम न झाल्यामुळे करमाळा शहर बकाल झाले आहे. आता यासाठीसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन नगरपालिकेच्या विकासासाठी व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नुकत्याच झालेल्या कृषी मेळाव्यात आपण बहुतांश भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यामुळे आपल्या भाजप प्रवेश होणार, अशी चर्चा आहे. यावर बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, स्वर्गीय दिगंबर बागल यांचे सर्व पक्षात व सर्व नेते मंडळींशी सलोख्याचे संबंध होते. कृषी मेळावा हा माजी मंत्री स्व. दिगंबर बागल यांच्या स्मरणार्थ भरवला असल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. याचा अर्थ आम्ही शिवसेनेपासून लांब गेलो, असं होत नाही. आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या माध्यमातूनच आमचे काम सुरू आहे. राजकीय भूमिका वेगळी असती व सामाजिक कार्यक्रमातील भूमिका वेगळी असते हे समजून घेतले पाहिजे

आदिनाथच्या निवडणुकीत नारायण पाटील गटाशी करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, या निवडणुकी संदर्भात निवडणूक जिंकण्यासाठी दोन पावले मागे घेण्यात आमची तयारी आहे. मात्र, सर्वस्वी निर्णय प्राध्यापक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा शब्द आमच्या दृष्टीने अंतिम शब्द राहणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further exploration, I recommend visiting: READ MORE. Keen to hear everyone’s opinions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button