Uncategorizedताज्या बातम्या

आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब खबरदार :- माऊली पवार, जिल्हाध्यक्ष सकल मराठा समाज

सोलापूर (बारामती झटका)

तुमचा आणि बुद्धीमतेचा तसा फारसा संबंध असावा असे वाटत नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 50% वरचे आरक्षण मराठा समाजाला देता येणार नाही तेव्हाच फडणवीस यांनी बोगस आरक्षण दिले हे स्पष्ट होते. याशिवाय तत्कालीन फडणवीस सरकार आरक्षण देताना तुम्ही सत्तेत होता आणि आरक्षण गेले तेव्हा देखील तुम्ही सत्तेत होता. म्हणजे तुम्ही म्हणता ते मान्य केले तर तुम्ही मराठा आमदार आणि मंत्री लोक हेच मराठा समाजाचे खरे दुश्मन आहेत एवढं नक्की.

बाकी शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण एवढी तुमची पात्रता नाही. पैश्याच्या मस्तीवर बेताल होऊन नाचत राहणे ही तुमची सवय अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बारा बलुतेदार यांच्यासाठी स्वतःचे मंत्रिपद आणि आमदारकी सोडून एखादा ओबीसी मंत्री स्वतःच्या पदावर बसवा आणि नंतर मराठा समाजाला शहाणपणा शिकवा. आरक्षण कुठून मागायचे आणि कसे मागायचे हे ठरवायला मराठा समाज समर्थ आहे. आपण त्यात जास्त लोड घेऊ नये. पन्नास शंभर लोकांना आर्थिक मदत केली आणि तुकडे टाकून 20-25 पाळीव समनव्यक आजूबाजूला घेऊन बसला, म्हणून तुम्ही समाजाचे मालक होत नाही एवढं लक्षात घ्या. आणि उगाच मंत्रीपदाच्या जीवावर मराठा समाजाच्या मुळावर उठू नका…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button