Uncategorizedताज्या बातम्या

आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर.

सोमवारी हर हर महादेव करीत शिंदे गटातील शिवसेनेत नेते व कार्यकर्ते प्रवेश करणार त्यामुळे कोणत्या पक्षाला घरघर लागणार ?

नातेपुते (बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा पुणे सोलापूर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा कार्यक्रम जाहीर झालेला असून प्रथमच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर सोमवार दिनांक 05 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी नातेपुते येथे आगमन होत आहे. असा स्वीय सहाय्यक प्रमोद पाटील यांनी दौरा जाहीर केलेला आहे.


आरोग्य मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सोमवारी सकाळी सात वाजता कात्रज पुणे येथील निवासस्थानावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील कार्यक्रमास सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहणार आहेत नातेपुते शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे प्रथम भेट देणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीतून शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केलेले राजाभाऊ हिवरकर पाटील यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यक्रम करून कोविड योद्धांचा सन्मान व राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी अकरा वाजून 45 मिनिटांनी माळशिरस कडे मोटारीने प्रवास होणार आहे.

माळशिरस येथे आगमन झाल्यानंतर संतोष आबा वाघमोडे व इतर पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश व सत्कार समारंभ होणार आहे त्यानंतर माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयात सदिच्छा भेट देणार आहेत दुपारी 12.50 वाजता पंढरपूर कडे प्रयाण होणार आहे पंढरपूर मोहोळ सोलापूर बार्शी येथे मुक्काम मंगळवारी बार्शी परांडा भूम वाशी कळंब उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर मार्गे पुणे कात्रज येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम असा दोन दिवसाचा भरगच्च कार्यक्रमाचा दौरा आरोग्य मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे राज्य स्थापन करताना तानाजी मालुसरे यांची कोंढाणा किल्ल्यावरील स्वारी इतिहास काळात माहित आहे. महाराष्ट्रात रयतेच्या राज्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडाचा झेंडा हातात घेतल्यानंतर शिंदे गटातील शिवसेनेत अनेक नेते व कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील राजाभाऊ हिवरकर यांनीही प्रवेश केलेला आहे माळशिरस तालुक्यामध्ये शिंदे गटातील शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आरोग्य मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा प्रथमच माळशिरस तालुक्यात दौरा लागलेला असल्याने संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना सोमवार असल्याने हर हर महादेव ची घोषणा होणार अनेक पक्षांना घरघर लागणार असे एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button