ताज्या बातम्याराजकारण

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदार संघात नाद केला, भारतीय जनता पक्षाने पुराच केला…

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा होणार तर, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते प्रचाराचा शुभारंभ होणार…

माळशिरस (बारामती झटका)

देशाच्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागलेले आहेत. महाराष्ट्राच्या ४८ लोकसभेच्या जागेमध्ये चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या जागेमध्ये माढा लोकसभा मतदार संघ देशाच्या व महाराष्ट्राच्या चर्चेत आलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पुनश्च उमेदवारीसाठी नाद केला. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निवड समिती व महाराष्ट्रातील निवड समिती यांनी नाद पूराच केलेला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होऊन राज्यामध्ये शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक पक्षांची व संघटनांची महायुती आहे तर विरोधामध्ये काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक पक्ष व संघटनांची महाविकास आघाडी आहे. या दोन गटांमध्येच महाराष्ट्रातील ४८ जागांची लढत होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रेल्वे, रस्ते व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. केंद्रीय व राज्यातील नेतृत्वांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यातून मने जिंकलेली आहेत‌. माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यामुळे माढा लोकसभेची पुनश्च उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीने दिलेली आहे.

महायुतीमध्ये अजितदादा पवार गटाचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि भाजपमधील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी, आटोकाठ प्रयत्न केलेले होते. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतरसुद्धा रामराजे निंबाळकर व विजयसिंह मोहिते पाटील परिवार थांबलेले नाहीत. भाजप व खासदारांच्या विरोधात अपप्रचार सुरू असून शरदचंद्रजी पवार गटाची तुतारी हातात घेण्याच्या मानसिकतेत आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी संकटमोचन गिरीशजी महाजन यांना शिवरत्न बंगला येथे समजूत व नाराजी काढण्यासाठी पाठवलेले होते. परंतु, असभ्य व असंस्कृतपणाचे दर्शन घडलेले असल्याने देवेंद्रजी फडवणीस यांनी मोहिते पाटील परिवार यांना गृहीत न धरता माढा लोकसभेची रणनीती आखली आहे. पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्यात शुभारंभ करणार आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदार संघात केलेला नाद भारतीय जनता पक्षाने पुराच करण्याचे ठरवलेले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

28 Comments

  1. п»їcytotec pills online [url=https://cytotec.club/#]п»їcytotec pills online[/url] п»їcytotec pills online

  2. propecia without insurance [url=https://finasteride.store/#]cost of propecia for sale[/url] cost generic propecia without prescription

  3. lisinopril 20 25 mg tab [url=https://lisinopril.network/#]lisinopril generic drug[/url] lisinopril 30mg coupon

  4. lisinopril brand name in india [url=https://lisinopril.network/#]lisinopril 10mg price in india[/url] lisinopril 40 mg tablet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort