ताज्या बातम्याराजकारण

आ. बबनदादा शिंदे यांच्या एकाच गुगलीवर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीचा त्रिफळा उडाला आहे.

माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाख मताधिक्य देण्याचा संकल्प…

श्रीपुर-खंडाळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा लोकार्पण सोहळा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. बबनदादा शिंदे यांची गोलंदाजी…

महाळुंग (बारामती झटका)

महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. मागच्या वेळेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पन्नास हजाराच्या वर लीड होते. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत दोन लाखांचे लीड देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. या एकाच गुगलीने शिवामृत दूध संघाचे चेअरमन व भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या स्वप्नाचा त्रिफळा उडाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार बबनदादा शिंदे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत तरीसुद्धा, आमदार बबनदादा शिंदे यांनी दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे. यामध्ये माढा व करमाळा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगून भविष्यात नाईक निंबाळकर उमेदवार असतील, असेही सांगून टाकलेले असल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक खासदारच असे सोशल मीडियावर पोस्ट फिरवत असल्याने बबनदादांनी एकाच गुगली वर धैर्यशील मोहिते पाटील यांचा खासदारकीचा त्रिफळा उडवलेला आहे.

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत हद्दीमध्ये श्रीपुर-खंडाळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाच कोटीच्यावर रस्त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना माढा विधानसभा मतदारसंघाचे षटकार व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.

यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमारनाना पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक परमेश्वर मामा देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या कार्यक्षम नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण, गटनेते, नगरसेवक राहुल रेडे पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, ज्येष्ठ नेते मौलाचाचा पठाण, नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, नगरसेवक विक्रमसिंह लाटे, नगरसेवक शिवाजी रेडे पाटील, नगरसेवक नामदेव पाटील, नगरसेवक नामदेव इंगळे , नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, नगरसेविका सौ. जोस्ना सावंत पाटील, नगरसेविका सौ. तेजश्री लाटे, पै. अशोकदादा चव्हाण,अमरसिंह पिसाळ देशमुख, दादा लाटे, शिवादादा रेडे, बापू रेडे, रोहित काळे, पोपट काळे, जगदीश इंगळे, त्रिंबक वाळेकर, सचिन रेडे, संजय भगत, माऊली हाके, दादा झरकर, शैलेश शेंडगे, विलास महाडिक, दिनेश यादव, तात्या मुंडफणे, बाळासाहेब भगत, विक्रांत रेडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंत उर्फ दादाराजे घाडगे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, भाजपचे युवा नेते अतुलशेठ सरतापे, जांभूडचे सरपंच राहुल खटके, युवा नेते राहुल टिक पाटील, उघडेवाडीचे माजी उपसरपंच तानाजीराव जगदाळे, भाऊसाहेब भांगे, मनोज शेळके, अवचर नाना, पांडुरंग व्यवहारे, हरिदास व्यवहारे, भारत पाटील, गजानन पाटील, सुनील राजमाने, सुनील गायकवाड, गोपीनाथ झुरळे, बाळासाहेब थिटे, सुमित भोसले, नारायण पाटील, आप्पासो चव्हाण, हनुमंत भोसले, हरिदास चव्हाण, सुदर्शन मिसाळ, नामदेव जाधव, दिलीप मिसाळ आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माढा विधानसभेचे भावी आमदार रणजीतसिंह शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी भाषणामध्ये महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत व माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभेमध्ये असणाऱ्या १४ गावातील विविध विकास कामे प्रलंबित व मार्गावर असणारे याची सर्व माहिती दिली. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व खासदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांना एकाच तुळशीच्या हारामध्ये महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या कार्यक्षम नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण व ज्येष्ठ नेते पैलवान अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

आ. बबनदादा शिंदे यांनी पावसाने सुरुवात चांगली केलेली होती, असाच पाऊस राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करून भाषणाला सुरुवात केली. या भागातील अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास सात रस्ते या भागामध्ये मंजूर केलेले आहेत‌. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये चार रस्ते मंजूर केले आहेत. असे एकूण ११ रस्ते मुख्यमंत्री निधी व पंतप्रधान निधी मधून मंजूर केले आहेत. आज श्रीपुर ते खंडाळी या ५ कोटी रस्त्याचे भूमिपूजन करत आहोत. माळखांबी ते जांभूड, वेळापूर ते महाळुंग, श्रीपुर ते खंडाळी आणि खंडाळी ते बीएसएफ अशा जवळपास १४ गावांचे रस्ते खासदार साहेबांनी मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील इतर १४ गावातील जवळपास ४० किलोमीटरचे रस्ते मंजूर केले आहेत. विठ्ठलवाडी ते खाडमोडे वस्ती रस्त्याला बजेटमध्ये ६५ लाख रुपये दिले आहेत. लवंग ते २५/४ रस्ता ४ किलोमीटर रस्ता मंजुरीला पाठवला आहे. बोरगाव ते १४ सेक्शन ३ किलोमीटरचे कार्यारंभ आदेश झाले आहे. महाळुंगपासून ३ किलोमीटरचे वर्ग धरता काही दिवसांमध्ये होईल. नाबार्ड मधून मला आमदार निधी मधून ५ कोटी मिळाले होते. त्यामध्ये माढ्यासाठी २ कोटी, पंढरपूरसाठी २ कोटी आणि माळशिरसला १ कोटी असे दिले होते. त्यापैकी माळशिरस तालुक्यातील उंबरे ते भोसलेवस्ती व चंद्रकांतवाडी ते श्रीपूर सेक्शन १५ असे एक कोटी नाबार्डमधून पैसे दिले आहेत.

शासनामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. मागच्या वेळेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 50 हजारांचे लीड होते मात्र, यावेळी ते २ लाखाने निवडून यावेत, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. कारण, खासदारांनी कुठल्याही कामात गैरव्यवहार केलेला नाही. आम्ही जरी राष्ट्रवादीचे असलो तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कधी दुखावले नाही. कारण राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी करायचे असते. त्यादृष्टीने भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.

घरकुल, शेती महामंडळाच्या जागा यासह अनेक प्रश्न खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिवेशनामध्ये मांडले आहेत. महामंडळाच्या जागेवर बरेचसे लोक राहत आहेत, ती जागा त्यांच्या नावावर करून द्यायची आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यामध्ये लक्ष घालण्यासाठी सांगितले आहे. ज्या जागेवर लोक राहत आहेत, ती जागा त्यांना देऊन टाकावी आणि ज्या लोकांना घरकुलासाठी जागा नाही त्यांना महामंडळाची जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुरातन खात्यामार्फत काही रक्कम मंजूर झाली आहे पण यमाईदेवी मंदिराला रक्कम कमी पडू देणार नाही. त्या खात्याच्या वतीने आमदार किंवा खासदार यांच्याकडून एक रुपयाही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तसेच आमदार बबनदादा शिंदे यांनी अधिकारी यांना सल्ला दिला कामं चांगली करा, कारण माळशिरसमधील कामं पुन्हा महिनाभराने खराब होतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. काम चांगली करा आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवा. कारण कामं मंजूर करायची आम्ही आणि उद्घाटन करायचे तुम्ही असं काही करू नका. या १४ गावांमध्ये ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे आणि इथून पुढच्या काळातही करू. नेवरे येथील दलित वस्तीमध्ये मंदिर बांधण्याकरिता विनंती केली होती तीही आम्ही मान्य करू. असे आपल्या भाषणांमध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार यांनी पावसामुळे भाषण आटोपते घेतले‌. त्यांनी भाषणांमध्ये ५१ टीएमसी पाणी २०२५ मध्ये मिळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही. यमाई देवीचा पुरातन खात्याचा प्रश्न मिटलेला असून मंदिर परिसर विकास होणार आहे. सर्वांच्या सहकार्याबद्दल आभारही यावेळी व्यक्त करण्यात आलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. [url=http://buyprepaidcards.cvv2cvc.net]Site[/url]

    Item 01 Card Total Balance: $3 100 – Price $ 110.00
    Item 03 Cards Total Balance $9 600 – Price $ 180.00
    Item PayPal Transfers $500 – Price $ 49.00
    Item PayPal Transfers $2 000 – Price $ 149.00
    Item Western Union Transfers $1 000 – Price $ 99.00
    Item Western Union Transfers $300 – Price $ 249.00

    *Prices on the website may vary slightly

    [url=http://buyprepaid-cards.cvv2cvc.net]http://buyprepaid-cards.cvv2cvc.net[/url]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button