आ. यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्त्वपूर्ण जबाबदारी

शेळगाव (बारामती झटका)
शेळगाव (ता. इंदापूर) चे सुपुत्र व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांची विधानसभेचे तालिका अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा सोमवार दि. १७ रोजी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे. मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले असून यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. यशवंत माने यांना पवार यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.
आ. यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहे. त्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू म्हणून राज्यात ओळख आहे. यापूर्वी माने यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद भूषविले आहे. व ते सध्या संचालक पद भूषवत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमदार यशवंत माने यांनी घेतला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng