Uncategorizedताज्या बातम्या

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यासाठी १७.५० कोटींचा निधी

विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यामुळे जनतेमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

अकलूज ( बारामती झटका )

विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील रस्ते अतिशय खराब झालेले असून वाहतूकीच्या दृष्टीने गैरसोयीचे झालेले असून तालुक्यातील रस्त्यांच्या दुरूस्ती करता पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
त्यानुसार आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरूस्ती करता १७.५० कोटींचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजुर झालेला आहे.
माळशिरस तालुक्यातील खालील रस्त्यांसाठी निधी मंजुर झाल्याची माहीती आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

◼️मायणी-म्हसवड-माळशिरस-टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-लातुर-सोनवती- मुर्शिदाबाद-शिरूर-अनंतपाळ-तळेगाव-देवणी-लासोना ते राज्यसीमा राज्यमार्ग क्र. १४५ बाह्यवळण ०/०० ते १/१०० यासाठी २ कोटी रूपये

◼️नरसिंहपुर ते संगम -बाभूळगाव-वाफेगाव -वाघोली-लवंग-बोरगांव – वेळापुर राज्यमार्ग क्र. २१२,
कि.मी. ०७/०० ते १०/०० कि.मी.२६/०० ते २७/४०० मध्ये सुधारणा करणे याकरीता ३ कोटी रूपये

◼️कुरवली-कुरबावी-पिरळे-फोंडशीरस-कदमवाडी- तिरवंडी-चाकोरे-ते अकलूज रस्ता रा.मा.२१३
किमी ९/०० ते १८/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी ३.५ कोटी रूपये

◼️कुरवली-कुरबावी-पिरळे-फोंडशीरस-कदमवाडी- तिरवंडी-चाकोरे-ते अकलूज रस्ता रा.मा.२१३
किमी.३७/६०० ते ४२/०० मध्ये सुधारणा करण्यासाठी 2 कोटी रूपये

◼️रा.मा.४५ ,अकलूज विझोरी, निमगाव पिलीव इटकी दिघ॔ची,आटपाडी- शेटफळ- कोळे- घटनांदुरा- जखापूर कवठेमहांकाळ- करोळी- सलगर – टाकळी- मिरज-अर्जुनघाट- नरसोबाचीवाडी हेरवाड ते राज्यहद्द रा.म.क्र १५३, १२/८०० ते १५/०० ,२७/४०० ते २८/४०० , ३०/००० ते ३२/००० दुरूस्ती करणे यासाठी ३ कोटी

◼️अकलूज-म्हाळूग- बोरगाव- माळखांबी ते तोंडले-बोंडले, तांदुळवाडी-फळवणी शिंगोर्णी प्रजिमा क्रमांक ९३ ,कि.मी ०/०० ते ७/४०० रस्ता दुरूस्ती करता ४ कोटी रूपये

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थामुळे वाहतूकीस दळणवळणास मोठा अडसर निर्माण झाला होता. आता आमदार मोहिते-पाटील यांच्यामुळे रस्ता दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याची जनतेमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button