आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची “प्रकाशमान” कामगिरी
माळशिरस तालुक्यातील ऊर्जा क्षेत्राकरीता तब्बल ७० कोटी रूपयांची कामे मंजूर..!!
माळशिरस (बारामती झटका)
विकास गतिशील होण्यासाठी “ऊर्जा क्षेत्र” महत्वाचे असते, या उद्देशाने ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पुर्नोत्थान वितरण क्षेत्र योजने अंतर्गत व राज्याचे उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधेची व इन्फ्रास्ट्रक्चरची विविध कामे मंजूर झाल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माहिती दिली.
केंद्र सरकारच्या पुर्नोत्थान वितरण क्षेत्र योजनेंतर्गत अकलूज विभागातील कामे –
नवीन उपकेंद्र : यामध्ये मौजे गणेशगाव, महाळुंग व मोटेवाडी येथे ५ एम. व्ही. ए. क्षमतेची उपकेंद्रे उभारणे तसेच नेवरे उपकेंद्रामध्ये ५ एम. व्ही. ए. चा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणे व सदर कामांकरिता आवश्यक ३३ व ११ के. व्ही. उच्चदाब वाहिनी नवीन रोहित्रे उभारणे, रोहीत्रांची क्षमता वाढविणे आणि लघुदाब वाहिनी (ए.बी. केबल) उभारणे असे एकूण २८.१५ कोटी रुपयांचे काम मंजूर आहे.

सिंगल फेज फिडर सेपरेशन : यामध्ये संगम उपकेंद्रातील संगम, बाभूळगाव व जांभूळबेट फिडर, बाभूळगाव उपकेंद्रातील बाभूळगाव व वाफेगाव फिडर खंडाळी उपकेंद्रातील खंडाळी नागठाणा व दत्तनगर फिडर आणि विझोरी उपकेंद्रातील विझोरी, खंडाळी व खुडूस फिडर असे एकूण १० फीडरचे काम मंजूर आहे. यामध्ये उपकेंद्रातील फिडर बे, एस.डी.टी., ११ के. व्ही. उच्चदाब वाहिनी ७१.७७ कि.मी., १०० केव्हीएचे रोहित्र ४४ लघुदाब वाहिनी- १८.५० कि.मी. असे एकूण ८.४८ कोटी रुपयांचे काम मंजूर आहे.

फिडर बायफर्मेशन : यामध्ये पुरंदावडे, फोंडशिरस नवीन ३३ केव्ही उच्चदाब वाहिनी टाकणे १५ कि.मी. पुरंदावडे इस्लामपूर ३३ के. व्ही. उच्चदाब वाहिनीचा कंडक्टर बदलणे, ७ कि.मी., विविध ११ के. व्ही. फिडरला लिंक लाईन करणे ४० कि.मी., विविध ११ के.व्ही. फिडरचे कंडक्टर बदलणे – १९.५० कि.मी., ११ केव्ही फिडर वर CAPACITOR BANK बसवणे आणि लघुदाब वाहिनीचे ए.बी. केबल टाकणे २८५.४६ कि.मी. असे एकूण २६.९८ कोटी रुपयांचे काम मंजूर आहे.
तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून एकशिव व पानीव येथे 33/11 KV चे नवीन सबस्टेशन मंजूर झालेले आहेत. तर साळमुख व वेळापूर उपकेंद्राची क्षमतेत वाढ केलेली आहे.

संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अमृत महोत्सवी वर्षाला साजेशी कामगिरी करत आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी एकाचवेळी माळशिरस तालुक्यातील ऊर्जा क्षेत्राकरीता तब्बल ७० कोटी रूपयांची कामे मंजूर करून आणली आहेत. खऱ्या अर्थाने ही आ.रणजितसिंह यांची प्रकाशमान कामगिरीच म्हणावी लागेल, माळशिरस तालुक्यातील ऊर्जा क्षेत्रातील सुविधेमुळे शेतकरी, उद्योजक व्यापारी नागरीक यांच्या बहुतांश समस्या दूर होणार असल्याने आ. मोहिते पाटील यांचे नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
