अखेर फडफडणारा दिवा निमाला…

फलटणात मिस्टर रामराजेंच्या ३ दशकांच्या राजकारणाचा अस्त
सातारा (बारामती झटका)
डॉक्टर, तुम्ही फलटणला येता, कधी तुमच्या गाडीचा अपघात होईल आणि तुमचा मेंदू रस्त्यावर इस्तत पडेल याचा काही नेम नाही. त्यामुळं इथून पुढे फलटणमध्ये पाय ठेवताना दहावेळा विचार करा. हे शब्द होते तत्कालिन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांचे आणि समोरील व्यक्ती होते डॉक्टर नंदकुमार तासगावकर.
आज दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील बहुचर्चित अशा फलटण नगरपालिकेचा निकालही दुपारीच लागला. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील महानुभवांचे लक्ष या निवडणूक निकालावर लागले होते. अर्थात कुस्ती नाईक निंबाळकरांमध्येच होती. परंतु हे जरी नाईक निंबाळकर असले तरी यांच्यामध्ये विस्तव जात नव्हता. कारण यांच्यामध्ये विजयाभोपळ्याचे वैर होते आणि आहे तेही २ पिढ्यांपासून १९९५ साली फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिरवीचे सुपूत्र चिमणराव कदमांचा पराभव करून फलटण संस्थानचे तत्कालिन अधिपती मालोजीराजेंचा नातू असणाऱ्या रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदमांचा धक्कादायक निसटता पराभव करुन आपली मांड फलटणच्या मतदारसंघावर ठोकली होती. अर्थात याला बारामतीकरांचे पाठबळ होते. त्यामुळेच ही किमया शक्य झाली होती. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून फलटणकरांनी आपल्या राजांच्या तिन्हीही निर्विकार चेहऱ्यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिले. मात्र, हे स्थानही औटघटकेचेच ठरले. कारण महसूलमंत्रीपद मिळताच यांनी लोकांच्या जमिनीवरील सात बाऱ्यावर नाईक निंबाळकर ट्रस्ट व नागेश्वर देवस्थानचे शिक्के चढवले परंतु, लोकांकडे पर्याय नव्हता. खांद्यावर घेतलेच आहे तर कानामध्ये लघुशंका करेपर्यंत खाली उतरायचेच नाही, असा चंगही मिस्टर रामराजे आणि त्यांच्या दोन्ही भावांनी बांधलेला होता. सुमारे ३ दशके विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे कनिष्ठ बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सत्ता उपभोगली. परंतु फलटणचा विकास मात्र झाला नाही. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीमधील सभेत म्हटले होते, अरे लेकांनो, बारामतीचा अजून किती विकास करायचा, जरा फलटण, इंदापूर आणि दौंडला जावून या म्हणजे तुम्हाला विकास काय असतो हे कळून चुकेल, काही अपवाद सोडल्यास गेली २५ वर्षे मिस्टर रामराजेंनी आणि त्यांच्या दोन्ही बंधूंनी बारामतीच्या पवारांची कास सोडलेली नव्हती. मात्र, राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळी झाल्यानंतर ज्या शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातून विरोध असतानाही रामराजेंच्या लायकीपेक्षा जास्त झाले, त्याच रामराजेंनी सत्तेपुढे लाचार होवून शरद पवारांचा हात झटकून अजित पवारांचा हात हातात घेतला. हल्ली सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. परंतु कधी-कधी वय झाल्यानंतर मेंदूही काम करायचा बंद होतो. कदाचित अशा काही गोष्टी त्यांच्याबाबत घडल्या असाव्यात. २०१२ साली मी सातारा टुडे हे जिल्ह्यातील म्हणजेच रामराजेंचं पाठबळ होतं. दशकभर पालकमंत्री, त्यानंतर ५-६ वर्षे विधानपरिषदेचे सभापती असल्याने फलटण तालुक्यातील प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसिलदार आणि दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सकाळी-सकाळी लक्ष्मीविलास पैलेसवर त्यांना सॅल्युट मारण्यासाठी हजर असल्याने यांच्याविरोधात आवाज तरी कोण उठवणार ? परंतु, सातारा टुडेच्या माध्यमातून मी हा विडा उचलला. तालुक्यातील सोशिक, वंचित लोकांना आधार देत सातारा टूडेच्या माध्यमातून त्यांचा आवाज बुलंद केला. मिस्टर रामराजे आणि त्यांच्या दोन्ही बंधूंच्या विरोधात खाजगीतही बोलायला घाबरणारे सातारा टूडेच्या दट्ट्यामुळे चौकाचौकात व्यक्त होवू लागले. गेल्या दीड दशकामध्ये या तिन्ही भावांची सातारा टूडेने हवा काढली. २०१९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रामराजेंची उलटगिनती सुरु झाली होती. परंतु कधीकधी बुडणाऱ्या काठीचा आधार असतो त्याप्रमाणे २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार आले. आणि त्यात हे तरुन निघाले. सातारा टुडेच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही रामराजेसह त्यांच्या दोन्ही भावांचा लेखाजोखा मांडून त्यांना दे माय धरणी ठाव करून सोडले होते. याला फलटणकरच काय पण सातारा जिल्ह्यातील लाखो जनता साक्षीदार आहे. यावर लिहायचे झाले तर पुस्तकाच काय पण खंडही पुरणार नाहीत. भविष्यात यावर एखादे पुस्तक आले तर आश्वर्य वाटायला नको. तर जिथून सुरुवात झाली तिकडे वळूयात…

डॉ. नंदकुमार यादवराव तासगावकर हे व्यवसायाने डॉक्टर. मुंबईतील दादरमध्ये शिवसेनेचे हेडक्वार्टर असलेल्या सेनाभवनाला लागूनच त्यांची इमारत. तिथे ते रेडीओलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करत होते. रायगडमधील कर्जतमध्येही त्यांचे मोठे शैक्षणिक संकुल आहे. हजारो विद्यार्थी तिथे ज्ञानार्जन करत आहेत. साधारणतः २००७ ते २००८ च्या आसपास त्यांनी फलटण तालुक्यातील बरड गावालगत सुमारे ३०० एकरापेक्षा जास्त जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर साखर कारखाना उभारण्याचा परवानाही मिळवला. एव्हाना ही खबर मिस्टर रामराजेंच्या कानावर पोहोचली. कोण कुठला डॉक्टर फलटणमध्ये येतो, ३०० एकर जमीन खरेदी करतो आणि वरुन साखर कारखान्याचे लायसन्सहीही मिळवतो ?
आता हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. अगदी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र मिस्टर रामराजेंच्या हट्टापायी हा प्रयत्नही निष्फळ ठरला. ज्या बरडच्या रानमाळावर पावसाळ्यात गवतही उगवत नव्हते. अशा जमिनीवरती डॉ. तासगावकरांनी नंदनवन उभे केले होते.
महाराष्ट्रातीलच काय पण, भारतातील सर्वांत मोठे ग्रीन हाऊस म्हणजेच हरितगृह, ५००० गायी म्हशी सामावू शकतील असा गायींचा आणि म्हशींचा अत्याधुनिक गोठा, दिवसाला ८००० मेट्रीक टन गाळप होईल अशा सुसज्ज कारखान्याची पायाभरणी सुरु केली होती. परंतु सरंजामी डोक्यात भिनलेल्या मिस्टर रामराजेंना स्वत:च्या स्वार्थासाठी हे बघवले नाही. शेवटी फलटणमध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर ५०% भागीदारी दिली पाहिजे आणि तीही एक छदाम न देता. अहो, ही तर एक प्रकारची खंडणीच झाली. पण हातात सत्ता असल्यानंतर आपले कोणी वाकडे करू शकणार नाही. अशा मस्तीत रमणाऱ्या रामराजेंचा आज हिशोब चुकता झाला आहे. त्यांचे पानिपत झाले. मागील विधानसभेत त्यांच्या विचारांच्या आमदाराचा पराभव झाला आणि आता सलग फलटणच्या नगरपालिकेतील सत्ताही गेली आहे. फलटणच्या पांढरीमध्ये मस्ताव लोकांना फारकाळ थारा मिळत नाही, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. १४ व्या शतकात उत्तरेतून आलेल्या निंब राजाने फलटणमध्ये स्वतःची गादी स्थापन केली आणि त्याच निंब राजाचे रामराजे वंशज म्हणून मिरवतात. २०१९ साली गमतीने सातारा टुडेच्या माध्यमातून ‘बिर्हाड निघालंय पुण्याला’ या मथळ्याखाली एक अर्कचित्र (कार्टून) प्रकाशित करुन फलटण तालुक्यात धमाल उडवून दिली होती. सध्या ते काढून फलटणकरांच्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जात आहे. राजाचा पराभव झाला आणि आजतर राजपुत्राचाही झाला. डॉक्टर तासगावकरांचा मेंदू रस्त्यावर इस्तत पाहण्याची धमकी देणाऱ्या रामराजेंचे आज नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पानिपत झाले आहे आणि भविष्यातील राजकारणामध्ये त्यांचा टिकाव लागण्याची शक्यताही धूसर झाली आहे. अशी परिस्थिती गेल्या ३० वर्षाच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचा बॉस होण्याच्या नादामध्ये मिस्टर रामराजेंनी संसाराची राखरांगोळी केली आहे.
(व्हॉइस ऑफ सातारा साभार)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



