Uncategorized

आ. राम सातपुते यांनी स्वकर्तुत्वातून उभारलेल्या घरामध्ये मातोश्री स्व. सौ. जिजाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला.

कार्यकर्तृत्वातून माणसाच्या मनामध्ये घर करणाऱ्या आ. राम सातपुते यांच्या डोईठाण येथील मूळ घराकडे नेते व कार्यकर्त्यांची रिघ लागली होती.

डोईठाण पंचक्रोशी आष्टी तालुक्यातील लोकांना आमदार राम सातपुते यांच्या जनसंपर्क व कार्याचा अंदाज आला आहे.

माळशिरस (बारामती झटका),

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मतदार संघातील जनतेची सेवा करण्याकरिता माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील ५० फाटा या ठिकाणी स्वकर्तृत्वातून उभारलेल्या श्रीराम या घरामध्ये मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आई-वडिलांनी ऊसतोड मजूर म्हणून ज्या परिसरात काम केले, त्याच परिसरात चांगल्या संस्कारातून घडलेल्या मुलाने स्वकर्तुत्वातून उभारलेल्या घरामध्ये सौभाग्य मृत्यू आल्याचे भाग्य मातोश्री जिजाबाई यांना मिळालेले आहे.

स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्यावर मूळ गावी डोईठाण, ता. आष्टी येथील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात आलेले होते.

स्वर्गीय जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्याने हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रा स्वर्ग रथातून निघालेली होती. अंत्ययात्रेच्या वाटेने पुष्प व हळदी कुंकवाचा सडा टाकण्यात आलेला होता. वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रेला सुरुवात केलेली होती. स्वर्गरथामध्ये पार्थिव देह ठेवून शेतामध्ये दहन देण्याचा कार्यक्रम झालेला होता. सौ. जिजाबाई यांचे भाग्य मोठे आहे. आमदार झालेल्या पुत्राने मुखाग्नी दिलेला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, आष्टीचे आमदार बाळासाहेब आसबे यांच्यासह आष्टी तालुका व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे केलेले असल्याने सर्वसामान्य जनतेतून मातृप्रेमाला मुकलेले असल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. खासकरून माळशिरस तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, नातेपुते नगरपंचायतचे पदाधिकारी व नगरसेवक, माळशिरस नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, दूध संस्था, मजूर संस्था, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम सातपुते यांनी मतदार संघ सर्व सामान्य जनतेची व्यक्तिगत कामे विशेषकरून गोरगरिबांची दवाखान्याची मोफत ऑपरेशन करून गरिबांना दिलासा दिलेला होता. तर, सार्वजनिक अनेक विकासाची कामे केलेली असल्याने कार्य कर्तृत्वातून माणसांच्या मनामध्ये घर करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील मूळ घराकडे नेते व कार्यकर्त्यांची रिघ लागलेली होती. डोईठाण पंचक्रोशी व आष्टी तालुक्यातील लोकांना आमदार राम सातपुते यांच्या जनसंपर्क व कार्याचा अंदाज आलेला असणार आहे. डोईठाण गावामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते व कार्यकर्ते सातपुते परिवार यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन सांत्वनपर भेट देण्याकरता आलेले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर आवाहन केलेले होते, आपल्या भावना समजू शकतो. सध्या पावसाचे दिवस असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेने डोईठाण इकडे येऊ नये. शुक्रवारी ३० तारखेला सर्व विधी आटोपून येत आहे, असे कळविलेले होते. तरीसुद्धा अनेक लोक दुःखामध्ये सहभागी होण्याकरता गेलेले होते. शुक्रवारी ३० जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता माळशिरस तालुक्यातील जनतेला मांडवे, ५० फाटा येथे भेटण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button