Uncategorized

आ. राम सातपुते व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवानेते अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेऊन स्वर्गीय एकनाथ देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्व. एकनाथ देशमुख यांनीअकलूज येथे उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर ६१ फाटा माळशिरस येथे अंत्यसंस्कार करून रक्षाविसर्जन कार्यक्रम झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार राम सातपुते अधिवेशनात व्यस्त असल्याने व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील बाहेरगावी असल्याने त्यांनी रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी देशमुख परिवारांची सांत्वनपर भेट घेतली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button