सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांची दमदार कामगिरी….

जिल्हा बँकेतील माळशिरस तालुक्याचे स्थान कायम ठेवत सलग चौथ्या वर्षीही तालुक्याने कमकाजाबाबतीत हट्रिक केली, हे श्रेय तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे…
पंढरपूर (बारामती झटका)
आज दि. 13/09/2025 रोजी पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक जिल्हा कर्मचारी वेल्फेअर ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे स्नेह मेळावा पार पडला.
सोलापूर जिल्हा मध्य. सह. बँकेने कर्मचाऱ्यांना बँक डेव्हलपमेंट प्लॅन दिलेला होता. यामध्ये माळशिरस तालुक्याने 2021 /22 व 2022/23 आणि 2023/24 वर्षांमध्ये बँकेने ठेवलेले जिल्हा पातळीवरील एक नंबरचे बक्षीस फिरता चषक तालुक्याने मिळवला होता. त्याचप्रमाणे 2024/25 मध्येही तो कायम ठेवत माळशिरस तालुक्याने पटकावला आहे. सोलापूर डी.सी.सी.बँक तालुका माळशिरस उत्कृष्ट कामकाज, जिल्ह्यात 1 नंबर वसुली व बँकेने दिलेले टार्गेट पूर्ण करून एक नंबरचे जिल्ह्यातील बक्षीस मिळवले आहे.

मा. बँकेचे कुशल प्रशासक श्री. कुंदन भोळे साहेब, बँकेचे सिईओ श्री. शिंदे साहेब, मॅनेजर श्री. देशपांडे साहेब यांचे हस्ते फिरता चषक व सन्मानपत्र देऊन तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. तसेच माजी आमदार मा. श्री. प्रशांत परिचारक साहेब, बँकेचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, पालक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व सिनियर बँक इन्स्पेक्टर, सर्व बँक इन्स्पेक्टर, सर्व शाखाधिकारी व जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.

माळशिरस तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर श्री. एम. बी. थोरात यांना गौरवण्यात आले. जिल्हा बँकेतील माळशिरस तालुक्याचे स्थान कायम ठेवत सलग चौथ्या वर्षीही तालुक्याने कमकाजाबाबतीत हट्रिक केली आहे. हे श्रेय तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



