इतर राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्राचा वापर – आ. रोहित पवार
कौटुंबिक भांडणाचा वाद काढू नका, विमान सेवेसाठी खासदार दमदार असावा
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस यांचे अनैतिक सरकार बदला घेण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राची बदनामी करून इथल्या जनतेला वेठीस धरले जात आहे. इतर राज्यांमध्ये सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्राचा वापर केला जात आहे, असा घणाघाती झाला आमदार रोहित पवार यांनी घातला आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या ‘गंगा निवास’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, सोलापूरच्या दृष्टीने विमान सेवा असणे महत्त्वाचे आहे. आणि तीस हजार शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला साखर कारखाना ही चालला पाहिजे.
विमानसेवेच्या प्रश्नात कौटुंबिक भांडणाचा वाद काढता कामा नये. विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार दमदार असावा लागतो. होटगी रोड ऐवजी बोरामणी हा पर्याय यासाठी आहे, तो स्वीकारला पाहिजे. मात्र, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून यात राजकारण आणले जात आहे, असेही ते म्हणाले.

सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादीची परिस्थिती, सोलापूर जिल्ह्याचा विकास, जुन्या पेन्शनचा प्रश्न, ‘सिद्धेश्वर’ ची चिमणी यांसह विविध प्रश्नांना स्पर्श करत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी धर्मराज काडादी, पुष्कराज काडादी, भारत जाधव, संतोष पवार, सुधीर खरटमल, किसन जाधव, तौफिक शेख, प्रशांत बाबर आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng