मांडवे गावातील दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून दिवाळी भेट
माळशिरस (बारामती झटका)
शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्नामधील अपंगांसाठी पाच टक्के निधी खर्चणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीपासून अपंगांना समान निधी वाटण्याचे नियोजन सुरू झाले आहे. गतवर्षी रोख स्वरूपात तर यंदा दीपावली किट देऊन अपंगांची दिवाळी गोड करण्याचं काम ग्रामपंचायतीने केले, असे मत ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंत टेळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे अपंगांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पाहण्यास मिळाले. यापुढे देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना त्यांच्या दारापर्यंत कशा पोहोचतील यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही लक्ष देऊ असेही ते म्हणाले.



यावेळी कुमार नाना पाटील, रामभाऊ गायकवाड, मारुती पालवे, तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पालवे, रितेश पालवे, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक बी. ए. भोसले व अपंग बांधव उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

