उघडेवाडी सरपंच पदाची गवळी व भगत यांच्यात समोरासमोर लढत सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध.
मोहिते पाटील समर्थक दोन गट व विरोधी एक गट यांच्यामध्ये मनोमिलन ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध अपक्ष यांनी सरपंच पदाची निवडणूक लावली.
उघडेवाडी ( बारामती झटका )
उघडेवाडी तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायतच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी जिजाबाई तानाजी गवळी व रूपाली प्रभाकर भगत यांच्यात समोरासमोर लढत लागलेली आहे ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व 11 सदस्य बिनविरोध झालेली आहे.
उघडेवाडी ग्रामपंचायत मध्ये नितीन बबनराव चौगुले माधव खंडू कदम संगीता सुरेश पवार गिरीजा सयाजी उघडे अंजली सागर सस्ते मिताली धनंजय साठे संग्राम सिंह श्रीमंत माने देशमुख प्रतिभा पोपट कोळेकर सोनाली योगेश काटकर महेंद्र महादेव घोगरे लक्ष्मी शिवाजी उबाळे असे अकरा सदस्य बिनविरोध झालेले आहेत उघडेवाडी गावामध्ये मोहिते पाटील समर्थक 2 गट आणि विरोधी 1 गट असा सामना नेहमी असतो यंदाच्या निवडणुकीत राजकीय गट तट बाजूला सारून मोहिते पाटलाच्या दोन्ही गटांनी चार चार सदस्य घेतलेले असून विरोधी गटाला तीन सदस्य दिलेले आहेत. सर्वानुमते जिजाबाई तानाजी गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली होती मात्र रूपाली प्रभाकर भगत यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने सरपंच पदाची निवडणूक लागलेली आहे गवळी यांनी शिट्टी चिन्ह घेतलेले आहे तर भगत यांचे कपबशी चिन्ह आहे.
माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उघडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विलास रणसुंभे काम पाहत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, wonderful weblog format! How lengthy have you been blogging for?
you make blogging look easy. The whole look of your site is wonderful, let alone the content!
You can see similar here sklep online
Wonderful analysis! Your insights are very enlightening. For more detailed information, check out: DISCOVER MORE. Keen to hear your views!