उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलम मध्ये करावा, सदाशिवनगर पुरंदावडे गावातील व्यापारी व जनतेची मागणी योग्य
माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आ. राम सातपुते या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची जनतेची अपेक्षा
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणात सदाशिवनगर पुरंदावडे या गावामध्ये उड्डाणपूल करण्याचे काम सुरू आहे. सदरच्या पुलाला ग्रामस्थ, व्यापारी अथवा स्थानिक नागरिक यांचा विरोध नाही. सदरचा उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलममध्ये तयार करावा, अशी मागणी केली आहे.
भविष्यात दोन्ही गावाच्या अस्तित्वासाठी मागणी योग्य आहे, यासाठी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार राम सातपुते या तिन्ही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची सदाशिवनगर व पुरंदावडे जनतेची अपेक्षा आहे.
सदाशिवनगर पुरंदावडे दोन्ही ग्रामपंचायतींनी उड्डाणपूल संघर्ष समिती स्थापन करून सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन दि. 23/07/2022 रोजी समस्त ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन दोन्ही गावाची वस्तुस्थिती व स्थानिक व्यापारी, नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्या अडचणी सांगितल्यानंतर निश्चितपणे मार्ग निघेल. कारण देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. योगायोगाने तिन्ही लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात संयुक्त बैठक केल्यास निश्चितपणे मार्ग निघेल, कारण ग्रामस्थांची मागणी योग्य आहे.
पालखी महामार्गासाठी विरोध नाही किंवा उड्डाण पुलालासुद्धा विरोध नाही फक्त, रचना बदलावी एवढाच प्रश्न आहे. प्लेटच्या उड्डाणपूलाचे काम थोडे झालेले आहे. त्यामुळे सदरचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल तयार व्हावा, ही अपेक्षा आहे. तसे नाही झाल्यास भविष्यातील पुढील सर्व पिढ्यांचे भवितव्य अंधारात राहणार आहे.
सदाशिवनगर व पुरंदावडे ग्रामपंचायत सुद्धा भाजप व मोहिते पाटील यांच्या विचाराची आहे. यासाठी मोहिते पाटील यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यांचे दुर्लक्ष झाल्यास लक्ष देण्यासाठी अन्य मंडळी येऊ शकतात, हे भविष्याच्या राजकारणासाठी घातक ठरू शकते. यासाठी मोहिते पाटील समर्थकांची मागणी आहे तिन्ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून उड्डाणपूल कॉलमचा करण्यासाठी प्रयत्न करावेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
A very well-written piece! It provided valuable insights. What are your thoughts? Click on my nickname for more discussions!