उद्योगमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांची यूवा उद्योजक कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार श्री. उदयजी सामंत यांची मुंबई येथे मंत्रालयात शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर युवा उद्योजक कीर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला. यावेळी उद्योग व्यवसायाविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग महर्षी स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न उद्योग समूहाची स्थापना करून अनेक उद्योग व्यवसाय सुरू आहेत. स्वर्गीय बापूसाहेब यांच्या पश्चात स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने कीर्तीध्वजसिंह आणि शिवतेसिंह यांनी बापूसाहेब यांनी सुरू केलेले उद्योग व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत.
आधुनिक युगात नवीन तंत्रज्ञान व टेक्नॉलॉजीने नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता कीर्तध्वजसिंह मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री ना. उदयजी सावंत यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन उद्योग व्यवसायाविषयी सविस्तर चर्चा केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng