Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

उद्योग प्रकल्प – म्हसवड – धुळदेव इथंच झाला पाहिजे, आंदोलन कर्त्यासमोर आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगरसाहेब यांनी मांडली भूमिका

ॲड. एम. एम. मगर साहेब यांच्या भूमिकेचे आंदोलकांनी केले समर्थन

माळशिरस (बारामती झटका)

मुंबई-बंगलोर काॅरीडाॅर अर्थात मोठे औद्योगिक केंद्र म्हसवड – धुळदेव ता. माण येथे स्थापन करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने निश्चित केले होते. त्यात माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण साहेब यांनी त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना सांगुन वरील प्रकल्प म्हसवड – धुळदेव ता. माण येथे करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठीचा जी.आर १६/३/२२ काढला होता. जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यासाठी म्हसवड – धुळदेव येथील २९३२:७३ हेक्टर एवढी जमीन व माळशिरस तालुक्यातील मौजे गारवड येथील १७५४:५२ हेक्टर एवढी जमीन संपादनाबाबत शासन राजपत्र प्रसिद्ध झाले होते. या औद्योगिक प्रकल्पामुळे या भागातील दोन ते अडीच लाख लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातारा, सांगली व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील बेरोजगारीची समस्या सुटणार आहे. अशा परिस्थितीत मंजुर झालेला औद्योगिक प्रकल्प कोरेगांव तालूक्यात हलविण्याचा घाट या नविन सरकारच्या काळात घातला जात आहे. त्यासाठी २ आक्टोबर या दिवशी मौजे म्हसवड येथे हजारो शेतकरी, युवक यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनात आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी आपली भुमिका मांडली. त्यास सर्व आंदोलक कार्त्यकत्यांनी समर्थन देवुन, प्रकल्प इथंच झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली.

आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. ते शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरे, प्रशिक्षण मोहीम, कृषी माहिती, कृषी प्रदर्शने घेत असतात. शेतकऱ्यांविषयीच्या विविध योजनांची माहिती, पिक कर्ज, भरघोस उत्पन्नाविषयी ते सतत शेतकऱ्यांना शिबिरांच्या माध्यमातून प्रात्याक्षिके दाखवून माहिती देत असतात. शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तरुण शेतकऱ्यांना ते नेहमी प्रोत्साहित करत असतात.

वरील औद्योगिक प्रकल्पाच्या आंदोलनाचे नेतृत्व कृष्णा खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. महादेव कापसे, श्री. शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष श्री. भानुदास सालगुडे पाटील, लोणंद-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजीत बोरकर यांनी केले. त्याचप्रमाणे या नेतेमंडळींनी यापुर्वी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांना भेटुन निवेदन दिले होते. त्यांनीही हा प्रकल्प म्हसवड – धुळदेव इथंच होणार असल्याचे आश्वासन वरील नेते मंडळींना दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला हा औद्योगिक प्रकल्प म्हसवड – धुळदेव या माण तालुक्यातच करणे भाग पाडण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृष्णा खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी भाषणात दिला. आंदोलकांसमोर ॲड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील, अजीत बोरकर व माण तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींची भाषणे झाली. आंदोलनात आपला युवक शेतकरी फोरम चे संघटक सदस्य श्री. सुधीर ढवळे, श्री. रामभाऊ मस्के, वामनराव वाघमोडे, आण्णा क्षीरसागर, अभिजित पिसे, सलिम पठाण आदींसह शेतकरी, मजुर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button