उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येणार.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुदाम जाधव यांच्या त्री समिती पुढे तक्रारदारांची रीघ लागणार आहे.
माळशिरस ( बारामती झटका)
उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माळशिरस येथे कार्यरत असणाऱ्या भूमी अधीक्षक श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याकरिता तीन सदस्य समितीची निवड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयाचे सुदाम जाधव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांनी पत्र काढलेले आहे. सदरच्या प्रकरणी दि. 19/04/2023 रोजी सकाळी 11.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस या कार्यालयात प्रिया पाटील यांच्या चौकशी समिती नेमलेली आहे. उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येणार आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख औरंगाबाद श्री सुदाम जाधव यांच्या त्री समिती पुढे तक्रारदारांची रीघ लागणार आहे.
माळशिरस तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस या कार्यालयाविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी असणाऱ्या बाधित व पिढीत शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे सुदाम जाधव यांनी आवाहन केलेले होते त्याप्रमाणे तक्रारदार आपले अर्ज कागदपत्रे घेऊन मोठ्या प्रमाणात कार्यालयात उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांना नाहक त्रास दिलेला असल्याने शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे त्यामुळे अनेक तक्रारदार यांची कार्यालयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रारी व निवेदन दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांचेकडील विशेष तपासणी पथक भूमी अभिलेख औरंगाबाद यांचे आदेशान्वये तीन सदस्य समिती नेमलेली आहे. त्या अनुषंगाने श्रीमती प्रिया पाटील उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस यांचे बाबत तक्रारी व अर्ज असलेले नागरिक 19/4/2023 रोजी उपस्थित राहणार आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणात भूमी अभिलेख माळशिरस यांच्याकडून पीडित व बाधित शेतकऱ्यांना नाहक त्रास दिलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कार्यालयाकडून चुकीचे भूमापन झालेले असल्याने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. सुदाम जाधव यांच्या रूपाने अन्यायाला वाचा फुटणार असल्याने माळशिरस तालुक्यातील बाधित व पीडित शेतकरी आवर्जून उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng.